जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत बविआची भूमिका मोलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:31 AM2019-04-27T00:31:25+5:302019-04-27T00:32:33+5:30
उपप्रदेशाच्या विकासाला गती; शिक्षण, नोकऱ्या अन् विकासाच्या प्रक्रियेला गती
पालघर : वर्ष २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या संपूर्ण उपप्रदेशाला महत्व आले व तमाम राजकीय पक्षांनी आपले लक्ष या जिल्ह्यावर केंद्रित केले. २००९ मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी बाजी मारली व उपप्रदेशाच्या विकासाला चांगलीच गती मिळाली. जाधव यांनी आपल्या कार्यकालात अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाचा समावेश होता. अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावण्यात जाधव यशस्वी ठरले व जिल्हा विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाला. अनेक वर्षे सुटू न शकलेले प्रश्न सुटल्यामुळे जिल्हावासीयांनाही दिलासा मिळाला.
या भागातील तरु णांना माहिती व तंत्रज्ञान या महत्वाच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षण व कालांतराने रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. तसेच त्याविषयीचा सर्व्हे एका अमेरिकन कंपनीकडून करून घेतला. त्याचे दृश्य परिणाम येणाºया काळात जिल्हावासीयांना नक्कीच पाहावयास मिळतील. माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरु णांना रोजगार, ही संकल्पना राबवण्यासाठी आ. ठाकूर यांनी राज्य शासनाला वेळोवेळी मौलिक सूचना केल्या.
बांधकाम क्षेत्रातही बहुजन विकास आघाडीने मोलाची कामिगरी बजावली. सर्वसामान्यजनांच्या खिशाला परवडतील अशी बांधकामे करण्याकडे त्यांचा कल असून, कॉमन मॅन हा भरडला जाता कामा नये, याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली. त्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. विविध प्रांतातील नोकरदार मंडळी आता येथे स्थिरावली आहेत. शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आली. त्यामुळे कला व क्र ीडा या दोन्ही क्षेत्रालाही चांगलेच महत्व आले आहे. सन 1990 पासून वसई तालुक्यात भव्य दिव्य असा कला व क्र ीडा महोत्सव आयोजित करण्यात येत असून या महोत्सवात सुमारे ५० हजार स्पर्धक सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला-क्र ीडा गुणांना वाव मिळावा,यासाठी हा सुरू झालेला महोत्सव आता उत्तरोत्तर वाढत आहे. विवा महाविद्यालयाने शेतीविषयक विविध चाचण्या पार पाडल्या. शेतकºयाना शीतगृहे व बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वसई-विरार शहर मनपा प्रयत्नशील असून शेतीसाठी दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करत असते. जिल्ह्यात उद्योगधंदे यावेत, गावपातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी बहुजन विकास आघाडीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हे करत असताना प्रदूषण करणारे विनाशकारी प्रकल्प येऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली.
विरार येथे टर्मिनसची मागणी
महिलांसाठी स्वच्छतागृहे, रेल्वे स्थानकावर आरोग्य केंद्रे, सरकते जिने, महिला विशेष लोकलच्या संख्येत वाढ, स्वयंचलीत दरवाजे असलेले रेक्स इ. मागण्याचा पाठपुरावा बहुजन विकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे. विरार येथे रेल्वेची अनेक एकर जमिनी आहेत, त्यामुळे येथे टर्मिनस उभे करणे सहज शक्य आहे. मुंबईतील रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी येथे टर्मिनस उभारणे,अत्यंत गरजेचे आहे. ते झाल्यास लांब पल्याच्या गाड्या येथे सोडणे शक्य होऊ शकते.
५२ कोटी रु .चा निधी मंजूर : चर्चगेट- डहाणू उपनगरीय सेवेचे जिल्हावासीयांचे स्वप्न तत्कालीन खासदार बळीराम जाधव यांनी आपल्या अथक प्रयत्नाने प्रत्यक्षात उतरवले. तसेच डहाणू-नाशिक रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी या मार्गाचे सर्व्हेेक्षण करण्यासाठी केंद्राकडून ५२ कोटी रु .चा निधी मंजूर करून घेतला. येणाºया काळात हा प्रकल्पदेखील मार्गी लागण्याची शक्यता आहे.