वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:33 AM2018-11-24T00:33:26+5:302018-11-24T00:33:35+5:30
पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे.
वाडा : पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होते. रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरवात होत असल्याने वाडा शहरातील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.
पालघर-वाडा- देवगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून त्याचा ठेका शासनाने जिजाऊ कंट्रक्शन कंपनीला दिला आहे. अॅनोटी योजनेतून हा रस्ता मंजूर असून त्यासाठी ७२ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. खंडेश्वरी नाका ते देसई फाटा यादरम्यानचा रस्ता सिमेंट क्र ॉकीट तर उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. हा रस्ता १२ मीटर लांबीचा होणार आहे. शहरात मुख्य रस्ता त्यानंतर पथमार्ग असा हा रस्ता होणार आहे. ३५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाडा शहरात रस्त्यासाठी खुणा करण्याचे काम सुरू केले आहे.
वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खंडेश्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हातगाड्या, टपरीधारक व किरकोळ विक्र ेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्यातच ग्राहक काही सामान खरेदी करण्यासाठी आले, तर रस्त्याच्या बाजुलाच वाहने लावत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. दीड ते दोन किमीचा हा प्रवास करायला अर्धा ते पाऊण तास लागतो. पर्यायी रस्ता नसल्याने नाईलजास्तव नागरिकांना याच रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
आता रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याने काही महिन्यातच वाहतूककोंडीची समस्या संपुष्टात येणार असल्याने नागरिक सुटकेचा निश्वास टाकत आहेत.