विक्रमगडचा ‘कलकत्ता झेंडू’ मुंबईच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:49 PM2019-02-25T22:49:58+5:302019-02-25T22:50:04+5:30

दोन लाखांहून अधिक रोपांची लागवड : पडत्या काळातही शेतकऱ्यांना मिळतो ३५ रु पये किलोचा भाव

The 'Calcutta Jhandu' of Vikramgad in the Mumbai market | विक्रमगडचा ‘कलकत्ता झेंडू’ मुंबईच्या बाजारात

विक्रमगडचा ‘कलकत्ता झेंडू’ मुंबईच्या बाजारात

googlenewsNext

- राहुल वाडेकर


विक्रमगड : पावसाने दगा दिल्यामुळे गत मोसमात शेतकरी अगदी धायकुतीला आला होता. त्याचे परिणाम वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाड्यात आज ही दिसतात. मात्र, तालुक्यातील ओंदे गावातील प्रगतीशिल शेतकऱ्यांनी येथे अर्थजन्य देणारा कलकत्ता मोठा गोंडा असलेल्या झेंडुफुलाची तब्बल दोन लाखाहुन अधिक रोपांची लागवड करुन बिघडलेल्या अर्थचक्राला गती दिली आहे.


सध्या ओंदे गावातून जवळ जवळ तीन ते चार टन झेंडु काढला जात असुन तो दलालांच्या माध्यमातून थेट मुंबईतील दादरच्या बाजारपेठेत विक्र ीसाठी जात आहे. प्रथम सिजनमध्ये झेंडुला चांगला भाव मिळाला परंतु सद्यस्थितीत सणवार काही नसल्याने झेंडूचा भाव पडलेला आहे. तरी तो ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. हा भाव अर्धा असला तरी आपल्या पहिल्याच प्रयोगावर शेतकरी संजय सदानंद सांबरे समाधान व्यक्त केले.


विक्र मगड तालुका सुपिक जमिनीचा असल्याने पावसाळी भात लागवड तर उन्हांळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्र्षांपासुन फुलशेती या पिकाची लागवड शेतकरी हिवाळी व उन्हांळी हंगामात करीत आहेत. यावर्शी तालुक्यात हिवाळी हंगामात ३०० ते ३५० हेक्टरवर भाजीपाला त्याचबरोबर फुलशेतीचीही लागवड करण्यात आली आहे.


ओंदे गावातील शेतकऱ्यांचा फुलशेतीचा पहिलाच प्रयोग
ओंदे गांवातील १५ ते २० शेतकºयांनी यंदा आपल्या शेतामध्ये ३० एकरमध्ये बहरदार कलकत्ता जातीच्या दोन लाखाहुन अधिक झेंडुची लागवड केली आहे. दररोज तीन ते चार टन झेंडू तोडला जातो व दलालांच्या माध्यमातुन तो थेट दादरच्या मार्केटमध्ये विक्र ीसाठी जात आहे. संजय सांबरे, निलेश पाटील, यशवंत बाबु पाटील, बबन काशिनाथ जाधव, भुपेंद्र सांबरे, योगेश पाटील, दिलीप खुताडे, अरु ण पाटील, हेंमत प्रमोद ठाकरे यांनी झेंडुची लागवड केली आहे.

एकराला ५० हजार खर्च : झेंडूचे पीक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे आहे. या लागवडीकरीता बीयाणे, खत, मजुरी, ट्रक्टर असा मिळून जवळपास अर्धाएकरास ते एक एकरास ५० हजार रु पये खर्च येतो. लागवडीनंतर फक्त आठ दिवसांतून ऐकदा पाण्याची पाळी दयावी लागते. तर ऐकदा खत घालावे लागते. या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नाहीत.

Web Title: The 'Calcutta Jhandu' of Vikramgad in the Mumbai market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.