कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2023 09:46 PM2023-10-07T21:46:38+5:302023-10-07T21:47:06+5:30

यात एका वस‌ईतील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

canada crash 3 dead including 2 indian trainee pilots vasai youth among dead | कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश

कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :-कॅनडामध्ये झालेल्य विमान अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. कॅनडमधील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यात एका वस‌ईतील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

कॅनडाच्या वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान झाडावर कोसळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय ट्रेनी वैमानिकांची नावे आहेत. दोन इंजिन असलेले कमी वजनाचे विमान पायपर पीए-३४ सेनेका, ब्रिटिश कोलंबियाच्या चेविवैक शहरातमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. मृत्यू झालेले भारतीय वैमानिक हे मुंबईमधील असल्याचे सांगण्यात येत असुन अभय गडरु (२५) हा वसईतील एव्हरशाईन सिटी येथे राहणारा होता. त्याचे आई वडील चारधाम यात्रेत असून दिल्ली येथे त्यांना त्याच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळविण्यात आली आहे. ते रविवारी मुंबईत परतत आहेत. अभयने कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक पायलट म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी तो गेल्या तीन वर्षांपासून कॅनडा येथे गेला होता. या नोव्हेंबरमध्ये त्याचे प्रशिक्षण पूर्ण होणार होते. गडरु कुटुंबीय हे मूळचे काश्मिरी आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचावकार्य सुरू केले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: canada crash 3 dead including 2 indian trainee pilots vasai youth among dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.