वसईत ‘घन बरसे’ पाऊसगीतांचा शो रद्द, आयुक्तांनी घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:23 AM2018-07-30T04:23:21+5:302018-07-30T04:23:36+5:30
येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे.
नालासोपारा : येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले असताना पालिकेकडून पाऊसगीतांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आल्याबद्दल सर्व स्थरातून टीका व विरोध करण्यात येत होता. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना खुद्द या संगीतमय कार्यक्र माबाबत माहिती देण्यात आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार पाण्याखाली गेली होती. सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. औद्योगिक व शहरी भागात कोट्यावधीचे नुकसान झाले होते. अनेक उभरलेले संसार देशोधडीला लागले. अजुनही वसई या प्रलयकारी संकटातून बाहेर पडली नाही. मात्र शहराची ही अवस्था असताना पालिकेने ५ आॅगस्ट रोजी पाऊसगीतांचा कार्यक्र म ठेवला होता.
दरम्यान, हा कार्यक्र म झाल्यास निदर्शने करण्यात येणार असल्याचेही काही संघटनाकडून सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर पालिका आयुक्तांपासून सर्व वरीष्ठ अधिकार्यांची नावे छापण्यात आली होती. पण याबाबत कुणालाही माहिती देण्यात आली नव्हती. पालिकेचे आयुक्त सतिश लोखंडे यांना याबाबत कळताच त्यांनी तात्काळ हा कार्यक्र म रद्द करत असल्याचे सांगीतले. अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनीदेखील याबाबत आपणांस माहिती नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे नवघर माणकिपूर प्रभाग समितीमार्फत हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.
वसई -विरारमध्ये पूरपरिस्थीतीत शहराला सावरणे,पूरग्रस्त नागरिकांचे मनोधैर्य वाढवणे तसेच भविष्यात पुन्हा अशी संकटात येऊ नयेत म्हणून उपाययोजना करणे हि आमची प्राथमिकता आहे.असा कार्यक्र म यावेळी ठेवणे योग्य नाही.त्यामूळे मी तात्काळ कार्यक्र म रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
- सतीश लोखंडे, आयुक्त
वसई विरार महापालिका