तारापूर येथील २० नागरिकांना कर्करोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:35 AM2017-11-14T01:35:39+5:302017-11-14T01:36:03+5:30
तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार
पंकज राऊत
बोईसर : तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार असून तारापूर अणुशक्ती केंद्रामधील किरणोत्सर्गाचा हा परिणाम असल्याची भीती तारापूर परिसरात व्यक्त करण्यात येत आहे
अभिनव जनसेवा असोशिएशन या सेवाभावी संस्थेमार्फत आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या विद्यमाने दि .१० ते १२ नोव्हेंबर असे तीन दिवस तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर शिबीर पार पडले. त्यात २५ वर्षा वरील १८० स्त्रीया व १२० पुरु ष अशा एकूण ३०० नागरिकांच्या कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भशायची तपासणी करण्यात आली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिनव जनसेवा असोशिएशनचे संचालक परीक्षित पाटील,रॉकी तांडेल, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, मनोज संखे, गणेश दवणे, वैभव मोरे, भावेश तामोरे, बशिर शेख, बाबू पिल्ले,अमित दवणे, हिमांशु निजप ,नंदू नाईक, अविनाश मेहेर, प्रजोत दवणे आदींनी परिश्रम घेतले. शिबिराला आमदार अमित घोडा, केतन पाटिल, उत्तम पिंपले, सुधीर तामोरे, मेघन पाटील, तारापूर पोलिस स्टेशनचे कुंभारे इत्यादिनी भेट दिली.