CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 07:24 AM2020-04-11T07:24:54+5:302020-04-11T07:25:04+5:30

कोरोनाचा मृतदेह वसईत आला खरा ; मात्र वसई पोलिसांनी हरकत नोंदवून तो पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला !

cancer patient dies in private hospital in Mumbai due to corona | CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

Next

आशिष राणे,वसई

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूचा ससंर्ग झाल्याने  मृत्यू झाला आहे.

हा तरूण वसईच्या पापडी परिसरातला होता मात्र मागील दोन महिन्यांपासून मुंबईतच राहात असल्याचे समजते.

दरम्यान या तरुणाला ब्लड कँसर झाल्यानं तो दि.19 मार्च पासून मुंबईत खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता.

तसेच गुरुवारी या तरुणाची दाखल रुग्णालयात जेव्हा कोरोना संदर्भातील तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.

परिणामी शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू ही झाला.

धक्कादायक म्हणजे या कोरोनाने मृत्यू झालेल्या या तरुणाचा मृतदेह चक्क या मुंबईतील खाजगी रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करून तो वसईत अंत्यविधीसाठी शुक्रवारी आणला गेला.

मात्र शुक्रवारी वसईत आलेला हा कोरोनाचा मृतदेह व त्याचा अंत्यविधी वसईत करण्यास वसई पोलिसांनी गंभीर हरकत नोंदवून हा मृतदेह आल्या पावली पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला दिली.

याउलट कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहासाठी मुंबईत विशेष व्यवस्था असताना किंवा कोरोनाचा मृतदेह हा नातेवाईकांना सोपवलाच कसा आणि तो रुग्णालयाने वसईत पाठवलाच कसा ? असे अनेक प्रश्न वसई पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी उपस्थित केले आहेत.

वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 32 कोरोना बाधित रुगणाची संख्या झाली असून, यात आता चार मृत्यू झाले असून 

पालघर जिल्हयात आता क़ोरोना बाधितांचा आकडा हा 34 वर गेला आहे.

 

कोरोनाच्या मृतदेहाचा हा मुंबई ते वसई- पापडी प्रवास कसा होऊ शकतो ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संखोल चौकशी करावी !

कोरोना च्या जीवघेण्या विषाणूने सर्वत्र जगात हाहाकार माजला आहे, त्यातच कॊरोनाने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार कसे व किती वेळात कुठे करायचे याबाबत (WHO) "जागतिक आरोग्य संघटने"च्या वतीने काही गंभीर मार्गदर्शक तत्वे दिली आहेत,आणि ती संपूर्ण जगातील देशात असलेल्या त्या सरकारी आरोग्य यंत्रणा व त्यांच्या डॉक्टरांनी सक्त पाळावयाच्या आहेत,असे असतानाही मुंबईत देखील कोरोना ने मृत्यु झालेल्या मृतदेहासाठी स्वतंत्र व वेगळी स्मशान भूमी आहे, तर कोरोनाने मृत्यु झालेल्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तो मृतदेह ताब्यात देता येत नाही,तर  मुंबई ते वसई पापडी हा कोरोना चा मृतदेह प्रवास कसा होऊ शकतो ? या वसईत घडलेल्या या गंभीर प्रकाराची आरोग्य मंत्र्यांनी सखोल चौकशी करावी  अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

Web Title: cancer patient dies in private hospital in Mumbai due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.