कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांची दमछाक

By Admin | Published: June 9, 2015 10:29 PM2015-06-09T22:29:13+5:302015-06-09T22:29:13+5:30

दिवसभर प्रचारादरम्यान उन्हाचा कडाका आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या बैठकांमुळे कार्यकर्ते थकत असून १६ जूनची ते वाट बघत आहेत.

Candidates' tiredness while handling the workers | कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांची दमछाक

कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांची दमछाक

googlenewsNext

वसई : दिवसभर प्रचारादरम्यान उन्हाचा कडाका आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या बैठकांमुळे कार्यकर्ते थकत असून १६ जूनची ते वाट बघत आहेत. उन्हामुळे कार्यकर्त्यांची ५० टक्के शक्ती खर्ची पडत आहेत. त्यामुळे प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. त्यामुळे त्यांना सांभाळताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहेत. परिणामी, उमेदवारांचे कुटुंबीयही प्रचारात उतरले आहेत.
निवडणुकीत कार्यकर्त्यांना सांभाळणे उमेदवारांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्याला काय हवे, काय नको याची काळजी उमेदवाराच्या निकटवर्ती तसेच नातेवाईकांकडून घेतली जात आहे. काही उमेदवारांच्या घरातील व्यक्ती कार्यकर्त्यांचा खर्च, जेवण, रात्रभोजन आदींची काळजी घेत आहेत. कार्यकर्त्यांचा तांडा घेऊन प्रचार केल्यास मतदारांवर प्रभाव पडतो, असे वाटणाऱ्या उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. सकाळी उठल्याबरोबर उमेदवार त्यांची पत्नी, किंवा नातेवाईक प्रत्येक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रचार कोणत्या भागात आहे, कुठे एकत्र जमायचे याची माहिती देत आहे. त्यानंतर प्रत्यक्षात प्रचाराला सुरूवात होत आहे. सकाळी २ ते ३ तास प्रचार झाल्यानंतर १ ते ४ दरम्यान उमेदवार विश्रांती घेत आहेत. दुपारच्या वेळी मतदारांचा दरवाजा ठोठावला तर, त्यांची नाराजी ओढवेल या भीतीने या दरम्यान प्रचार मंदावत आहेत. सायंकाळी चारनंतर मात्र पुन्हा उमेदवार आपल्या फौजफाट्यासह प्रचाराच्या आघाडीवर दाखल होत आहेत. रात्री १० पर्यंत चालणाऱ्या या प्रचारात विशेष करून महिला मतदाराची सहज भेट होते. त्यांच्यासमोर आपल्या पक्षाची भूमिका व उमेदवाराने स्वत: केलेले समाजकार्याचा पाढा वाचला जात आहे. (प्रतिनिधी)

रात्री उशीरापर्यंत बैठक
रात्री उशिरापर्यंत उमेदवार कार्यकर्त्यां सोबत बैठक घेत आहे. अनेक कार्यालयामध्ये गुप्त बैठका पार पडत आहे. बंद कार्यालयात प्रचाराचे नियोजन होत आहेत.

कार्यकर्त्यांना मागणी
प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांची संख्या अधिक दिसावी यासाठी प्रत्येक उमेदवार काळजी घेत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष आहे.

Web Title: Candidates' tiredness while handling the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.