मद्यधुंद चालकामुळे कारला अपघात
By admin | Published: April 10, 2017 04:11 AM2017-04-10T04:11:19+5:302017-04-10T04:11:19+5:30
गुजरातच्या दिशेने बेफाम वेगाने जाणाऱ्या कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथील
पारोळ (पालघर) : गुजरातच्या दिशेने बेफाम वेगाने जाणाऱ्या कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथील काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाजवळ, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता झालेल्या अपघातात शैलेंद्र सिंगसह मुंबईचे अन्य चार जखमी झाले.
मद्यप्राशन केलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दोनदा उलटली आणि ती पंधरा फूट उंचीवरून शेतात जाऊन पडली. याच वेळी बाजूच्या रस्त्यावरून एक दुचाकीस्वार जात होता, त्याच्या वरून ती शेतात पडल्याने तो मात्र बचावला. या अपघातात सोबत प्रवास करणारे विनायक महाडिक (२६), राजू पाटील (२५), नरेंद्र नाईक (३२), प्रवीण गाडे (२१) सर्व राहाणार मुंबई हे जखमी झाले. या अपघातातील सर्व जखमी दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तसेच या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळल्या. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विनायकची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)
बाटल्या सापडल्या
ंदारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तसेच या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळल्या.