कार्डीनल आयवन डायस यांचे निधन
By Admin | Published: June 21, 2017 04:15 AM2017-06-21T04:15:38+5:302017-06-21T04:15:38+5:30
कार्डिनल आयवन डायस यांचे सोमवारी रात्री रोम येथे निधन झाले. मुंबईचे कार्डिनल आॅस्वाल्ड ग्रेशियस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर वसईत
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : कार्डिनल आयवन डायस यांचे सोमवारी रात्री रोम येथे निधन झाले. मुंबईचे कार्डिनल आॅस्वाल्ड ग्रेशियस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर वसईत त्यांच्यासाठी प्रार्थना सभा घेण्यात आल्या होत्या.
त्यांचे वसईशी वेगळेच नाते होते. पूर्वी वसई ही मुंबई धर्मप्रांताखाली कार्यरत होती. दिवंगत पोप जॉन पॉल दुसरे यांनी २२ मे १९९८ रोजी वसई धर्मप्रांताची निर्मिती केली त्यावेळी त्याची माहिती देण्याचा मान मुंबईचे कार्डिनल असलेल्या डायस यांना लाभला होता. त्यांनी २८ जून १९९८ रोजी वसई धर्मप्रांताची घोषणा केली. भारतीयांच्या प्रार्थना पद्धती त्यांना मुळीच मान्य नव्हत्या. गर्भपात तसेच समलैंगिकतेला चर्च करीत असलेल्या विरोधाला डायस यांनी पाठिंबा दिला होता. पोप फ्रान्सिस यांच्या निवड प्रक्रियेत जगभरातील ११५ कार्डिनल सदस्यांमध्ये ११ आशिया खंडातील होते. त्यात एकट्या भारतातील ५ कार्डिनल होते. त्यात त्यांचा सहभाग होता. १४ एप्रिल १९३६ रोजी वांद्रे येथे जन्मलेल्या कार्डिनल डायस यांनी ८ डिसेंबर १९५८ रोजी गुरुदीक्षा घेतली होती. २१ फेब्रुवारी २००१ रोजी दिवंगत पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल पद बहाल केले होते. घाना, कोरीया, आल्बेनिया या देशात पोपचे दूतावास म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.