पालघर-डहाणूबद्दल परेचा सावत्रपणा

By admin | Published: December 24, 2016 02:57 AM2016-12-24T02:57:21+5:302016-12-24T02:57:21+5:30

पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या

The carelessness of Palghar-Dahanu | पालघर-डहाणूबद्दल परेचा सावत्रपणा

पालघर-डहाणूबद्दल परेचा सावत्रपणा

Next

पालघर : पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या नाहीत. उलट सतत काहींनाकाही कारणास्तव इथल्या प्रवाशांच्या मागण्यांकडे पश्चिम रेल्वे सतत दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाश्यांनी निषेधाचे बॅनर वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या स्थानक परिसरात लावून आपला संताप व्यक्त केला आहे.
डहाणू रोडपर्यंतच्या भागाला सन १९९५ रोजी उपनगरीय क्षेत्राचा दर्जा बहाल केल्या नंतर तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर १६ एप्रिल २०१३ रोजी प्रथम चर्चगेट-डहाणू लोकलला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे इथल्या स्थानिक प्रवाशांनी या लोकलचे जल्लोषात स्वागत केले होते. आता आपला मुंबई पर्यंतचा प्रवास आता सुखकर होईल अशा दिवास्वप्नात असणाऱ्या प्रवाशांच्या अनेक मागण्यांना हरताळ फासण्याचे काम पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलेले आहे.
मेल-एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या मधून प्रवास करण्यावर एके ठिकाणी निर्बंध घातले जात असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या काही मोजक्या लोकलमध्ये जबरदस्तीने शिरकाव करून उलट स्थानिक प्रवाश्यांच्या हक्कावर विरारच्या काही प्रवाशांकडून गदा आणली जात आहे. अश्या वेळी घुसखोरी करणाऱ्या विरार प्रवाश्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानी कारवाई करणे अपेक्षित असताना उलट पालघरच्या प्रवाशाना मारहाण करून त्यांचावर केसेस नोंदविल्या जात आहेत. सोयीसुविधा पुरविण्याबाबत ही सतत अन्याय केला जात असल्याने प्रवाश्यामध्ये असंतोष पसरत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The carelessness of Palghar-Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.