कर्नाटकी फणस बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:49 AM2018-05-13T06:49:17+5:302018-05-13T06:49:17+5:30

फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकणी मेवा म्हणजेच फणस तो अनेकविध भागात विक्रीस’ येत असतो.

Carnatic junket market | कर्नाटकी फणस बाजारात

कर्नाटकी फणस बाजारात

googlenewsNext

राहुल वाडेकर
विक्रमगड : फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकणी मेवा म्हणजेच फणस तो अनेकविध भागात विक्रीस’ येत असतो. व आता तर कच्चा फणसापासून देखील विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जात असल्याने उपवासाला व इतर वेळेसही त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. त्यामुळे सध्या फणसाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेला आहे. परंतु अदयाप हे फणस बाजारात येण्यास १५ दिवसांचा कालावधी बाकी असून कर्नाटकी फणस सध्या येथील बाजारात दाखल झाला आहे. त्यावर खवैय्यांच्या उड्या पडत आहेत.
त्याच बरोबर वातावरणात बदल झाल्याने आंबा, काजूवर जसा परिणाम होतो. तसाच तो फणसांच्या उत्पादनावर देखील होतो. त्यामुळे यंदा कोकणातील या मेव्याची आवक थोडयाफार प्रमाणात घटणारच आहे. हयाच गोष्टीचा व गावठी व कोकणातील फणस बाजारात जरा उशिरानेच येत असल्याचा फायदा घेऊन कर्नाटकी फणस बाजारात लवकर दाखल झालेले आहेत. फणस दिसला की प्रत्येकाला कोकणाची आठवण होते.कारण बाजारात येणारे बहुतेक फणस हे कोकणातलेच असतात.हे फणस मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून बाजारात दाखल होतात. मात्र विक्र मगड व परिसरातील बाजारपेठेत मे च्या सुरु वातीलाच फणासाचे गरे दिसू लागले आहेत. खाण्यासाठी गोड,व उन्हांत थंडावा देणारे असल्याने फणस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडत आहे.
परंतु काही ग्राहकांनी सांगीतले की कोकणातील फणसाला जी गोडी व स्वाद, चव आहे तो हया कर्नाटकी फणसामध्ये तेवढया प्रमाणात नाही. विक्र मगड तालुक्यातही आता मोठया प्रमाणावर आदिवासीदेखील फणसांचे उत्पन्न घेत आहेत. एका झाडाला मोठया प्रमाणावर फळ येत असल्याने पूर्ण सिझनमध्ये चांगल्या प्रकारे अर्थाजन होते. मात्र कोकणतला फणस अजुन बाजारात येण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी जाणार आहे . कर्नाटकी फणसाच्या गोड सुगंधाने बाजारात घमघमाट पसरलेला आहे. वटपोर्णिमेला महिलांना फणसाच्या ग-याची आवश्यकता असते म्हणून पूजेसाठी फणसाला मागणी मोठया प्रमाणात असते. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच फणसाची आवक वाढली आहे हा फणस कर्नाटकातूनच येत असल्याचे सुरेंद्रम या विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात फणसाचे गरे नविन असल्याने १२० रुपये किलो या दराने विकले जात आहेत.एका फणसासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागतात असे त्यांनी सांगीतले. आठवडे बाजारात सात ते आठ हातगाड्यावर या फणसांच्या गरांची विक्री केली जात आहे. बाजारपेठेत पुढे फणसाची आवक वाढल्यानंतर हेच गरे ५० ते ६० रु पये किलोने विकले जातात. असे विक्र त्यानी सांगितले.त्यामुळे सध्यातरी ग्राहक महाग का होईना फणसाचे गरे मोठया आवडीने खरेदी करत आहेत. या कानडी फणसाने सध्यातरी येथील ग्राहकांवर मोहिनी घातली आहे.

Web Title: Carnatic junket market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.