कासा रुग्णालयाचे ‘ट्रॉमा सेंटर’ गायब; शासनाची परवानगी नसल्याने ओढवली नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:27 PM2019-01-03T23:27:18+5:302019-01-03T23:27:27+5:30

डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या कासा उपजिल्हा रुग्णालयावरुन एक महिन्यापूर्वी लावलेले ‘ट्रॉमा सेंटर’ हे बिरुद उतरविल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत.

Casa Hospital's Trauma Center disappeared; Due to lack of government permission, | कासा रुग्णालयाचे ‘ट्रॉमा सेंटर’ गायब; शासनाची परवानगी नसल्याने ओढवली नामुश्की

कासा रुग्णालयाचे ‘ट्रॉमा सेंटर’ गायब; शासनाची परवानगी नसल्याने ओढवली नामुश्की

googlenewsNext

- शशिकांत ठाकूर

कासा : डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या कासा उपजिल्हा रुग्णालयावरुन एक महिन्यापूर्वी लावलेले ‘ट्रॉमा सेंटर’ हे बिरुद उतरविल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत. रस्ते अपघातातील रुग्णांना त्वरित रुग्णसेवा मिळावी म्हणनू आय.आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने एक कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी खर्च करुन व्यवस्था उभी केली असलीतरी त्यास शासनाची मान्यता नसल्याने ही नामुष्की ओढावल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लोकमतकडे केला आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी आयआरबी कंपनीने ट्रॉमा सेंटर साठी सी. एस. आर. फंडातून खरेदी केलेले साहित्य ताब्यात घेतले आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असून जखमी रु ग्णांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, याठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत तर काही वैद्यकीय अधिकारी अन्य ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे रुग्णांना कासा उपजिल्हा रु ग्णालयात योग्य उपचार होत नाही. कासा उपजिल्हा रु ग्णालयात रुग्णांना तपासून बºयाच वेळा सुविधांचा अभावामुळे वापी किंवा मुंबई येथे हलवण्याचे सल्ले दिले देतात. वेळेच्या अपव्ययामुळे बºयाचदा रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
कासां उपजिल्हारुग्णालया अंतर्गत सोमटा, तवा, सायवन, तलवाडा, गंजाड, ऐना, (पान २ वर)

ट्रॉमा सेंटरचा फलक लावण्यासाठी कोणतीही वैद्यकीय अधिकाºयांंची परवानगी घेतली नाही. त्यामुळे सदर फलक आता काढण्यात आला आहे
- डॉ .कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

Web Title: Casa Hospital's Trauma Center disappeared; Due to lack of government permission,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.