लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात सीसीटीव्ही , गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:31 AM2017-11-17T01:31:31+5:302017-11-17T01:31:40+5:30
गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई : गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी व्यावसायिक, व्यापारी, जागरुक नागरीकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.
सध्या गुन्हेगार मोटार सायकलवरून चेन स्नॅचिंग आणि इतर गुन्हे करून पळून जातात. गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण असते. याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असतात. यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे लोक सहभागातून बसवण्यात येणार आहेत. व्यावसायिक, व्यापारी, जागरुक नागरीक यांनी आपण रहात असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाºयांशी संपर्क साधून कॅमेरे बसवण्याचे नियोजित ठिकाण निवडावे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून सुचवलेल्या चांगल्या प्रतीचे कॅमेरे खरेदी करून स्वत: बसवावेत. कॅमेरे खरेदी करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाºयांना पैसे देण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
नियोजित ठिकाणी कॅमेरे बसवल्याने चैन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांना आळा बसेल. आरोपींची ओळख पटवण्यासाठी या कॅमेºयांची मदत होईल. यामुळे जिल्हा पोलीस दलाचे आधुनिकीकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.