सागराला सोन्याचे नारळ अर्पून पौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:08 AM2017-08-08T06:08:27+5:302017-08-08T06:08:35+5:30

पावसाळी बंदी कालावधी संपून १ आॅगस्ट ला मासेमारीला सुरुवात झाल्याने मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या मच्छिमार बांधवांचे वादळवाऱ्यापासून रक्षण कर, त्यांच्या जाळ्यात भरपूर मासळी येऊ दे, अशी प्रार्थना आज मच्छीमारांनी सोनेरुपी नारळ अर्पण करून समुद्राला केली.

 Celebrate the full moon day with golden coconut | सागराला सोन्याचे नारळ अर्पून पौर्णिमा साजरी

सागराला सोन्याचे नारळ अर्पून पौर्णिमा साजरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पावसाळी बंदी कालावधी संपून १ आॅगस्ट ला मासेमारीला सुरुवात झाल्याने मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या मच्छिमार बांधवांचे वादळवाऱ्यापासून रक्षण कर, त्यांच्या जाळ्यात भरपूर मासळी येऊ दे, अशी प्रार्थना आज मच्छीमारांनी सोनेरुपी नारळ अर्पण करून समुद्राला केली. किनारपट्टीवरील मच्छिमार गावातील सर्व बांधव, महिला, तरु ण-तरु णी नी आपल्या परंपरागत पेहेरावामध्ये नाचत गात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.
पूर्वी शासनाने जाहीर केलेला पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी उलटून गेला तरीही नारळीपौर्णिमेला सागराची विधिवत पूजा करुन नारळ अर्पण केल्या नंतरच नौका मालक आपली नौका मासेमारी साठी समुद्रात पाठवित असतात. मात्र पारंपरिक रितिरिवाजाला तिलांजली देण्याचे काम शासकीय यंत्रणेने करून पावसाळी बंदी कालावधी घटवण्याचे काम परिपत्रकाद्वारे केलेले आहे. महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ च्या अन्वये पूर्वी १ जून ते १५ आॅगस्ट अथवा नाराळीपौर्णिमा अशी सुमारे ७५ दिवसाची पावसाळी मासेमारी बंदी कालावधी होता. आज पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यासह पालघर मधील सातपाटी , मुरबे, उच्छेळी-दांडी, केळवे, डहाणू इ. किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात आज नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. दांडी येथे नरेंद्र महाराज संप्रदायाकडून सागर पूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तर मुरबे येथे प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्यावर्षीही अनेक, प्रबोधनात्मक देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व किनारपट्टीवरील गावातील मच्छीमारांनी आपल्या कुटुंबियांसोबत समुद्रावर जाऊन पूजा करीत सोनेरूपी नारळ अर्पण केला.व समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या कोळी बांधवांचे रक्षण करून त्यांच्या नौकाना भरघोस मासे मिळू देत अशी प्रार्थना सागराला केली.

श्रमजीवीच्या भगिनींनी बांधल्या अधिकाºयांना राख्या

विक्रमगड : विक्रमगड तालुका श्रमजीवी संघटनेच्या महिलांनी तालुक्यातील तहसिलदार ,पोलिस व विविध शासकीय कार्यालये, अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार यांना राखी बांधून या तालुक्याचे अपप्रवृत्तींपासून रक्षण करावे व अडीअडचणी सोडवाव्यात, विकास साधावा असे साकडे घातले. यावेळी निवासी तहसिलदार एस कामडी, पोलिस अधिकारी पवार, ओमकार पोटे यांना ठिणगीच्या संविता कासट, सुनंदा गोंड,समित्रा झाटे,सुमित्रा कुवरा,हिरा कासट,मथुरा कदम,चांगुण ढोंबरा,सुरेखा घाटाळ,मजुळा मोरघा यांनी राख्या बांधल्या.
विनुबाई कुवरा,वंदन बरफ, सुमीबाई बेंदर, हिरुबाई जाधव, लता मालकरी या श्रमजीवीच्या महिलांनी शासकीय कार्यालयात जावुन उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला राख्या बांधून ऐक्याचा सण साजरा केला तर राष्टÑीय स्वयंसेवक संघाने विक्रमगड तालुक्यातील खेडयापाडयासह शाखेच्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे केले़
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शाळांमध्ये रक्षाबंधन करण्यात आले. अरविंद आश्रमशाळा दादडे येथील विदयार्थींनी विक्रमगड षहर व आजु बाजु परिसरातील दुकानदारांसह घरोघरी जाऊन राख्या बांधल्या.
हा उत्सव आनंदाने साजरा केला़ दरम्यान आश्रमशाळेतील भाउ-बहिणींनीही या कार्यक्रमांचा आनंद घेतला.

उच्छेळी, दांडी व नवापुर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

बोईसर : तारापूर जवळील उच्छेळी, दांडी व नवापूर समुद्र किनारी नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळ व मच्छीमारांतर्फे सकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून नारळी पौर्णिमा उत्सहात साजरी करण्यात आली. उच्छेळी गावाबाहेरील मैदानावरून सागरी किनाºयापर्यंत नारळी पौर्णिमेनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत मच्छीमार समुदाय व संप्रदायाचे बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीतील आकर्षक रंगाच्या पारंपरिक वेशभूषानी शोभा आणली होती.

मिरवणूक उच्छेळी मार्गे दांडी येथे पोहचल्यानंतर दांडी-नवापूर गावांदरम्यानच्या खाडीत बोटी एकमेकांना
जोडून व त्यावर प्लायवूड टाकून तयार करण्यात आलेल्या सागरी सेतूवरून सर्व भाविक खाडीवरून
नवापूर गावच्या किनाºयावर पोहोचल्यानंतर
कानिफनाथ महाराज यांचे प्रवचनाचे आयोजन केले होते. कलश पूजना नंतर खास सजविलेल्या बोटीमधून श्रीफळ सागरास अर्पणासाठी निघाले यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केलीत.

वाड्यामध्ये पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
वाडा : रियल अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थीनीनी ठाण्यातील पोलीसांना राख्या बांधून सण साजरा केला. एकीकडे तालुक्यातील सर्व नागरिक रक्षाबंधन सण साजरा करीत असतांना पोलीस मात्र जनतेच्या रक्षणाचे कर्तव्य पार पाडत असल्यामुळे आपल्या बहीणी कडून राखी बांधून घेण्यास व औक्षण करून घ्यायला त्यांना संधी व वेळ मिळत नसल्याने रियल अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात पोलीसांना औक्षण करून अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी संचालक विशाल ठाकरे, शशांक ठाकरे उपस्थित होते.

कोळी नृत्यांनी वाढविली पौर्णिमेची रंगत

बोर्डी : पारंपरिक कोळीनृत्य आणि शोभायात्रेद्वारे सजवलेल्या होड्यांचे पूजन करून दर्याला नारळ अर्पण करीत नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. डहाणू गाव येथील युवा मांगेला समजातर्फे चोवीस नाखावांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्र मही घेण्यात आले. डहाणू ते झाईपर्यंतच्या समुद्रकिनारी भागात मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी तरुणाईने देखील पारंपारिक वेशभूषा करून मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर सेल्फी काढण्यामध्ये त्यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ महिलांमध्येही मोठी चढाओढ लागलेली होती. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

वेळी कोळीबांधवांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. या निमित्त स्वाध्याय परिवारातर्फे विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू गाव, आगर, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी तसेच झाई समुद्रकिनारी होड्यांचे पूजन करून कोळीबांधवांनी सामूहिकरीत्या दर्याला नारळ अर्पण केला. सणानिमित्त किनाºयालगत गावांमध्ये दिवसभर उत्साही वातावरण होते. कोळी बांधवांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर करून पारंपरिक सणाला तंत्रज्ञानाची जोड देत व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून सणाचा आनंद द्विगुणित केला. त्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात आघाडीवर होती

शनिवार, ५ आॅगस्ट रोजी डहाणू युवा मांगेला समजातर्फे कलश स्थापन करून सत्यनारायाणची पूजा पार पडली. रात्री हळदीकुंकवाचा कार्यक्र म झाला. कोळीनृत्य स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी मच्छीमार समाज संघाचे संचालक प्रवीण ना. दवणे, माजी नगरसेवक हरेश मर्दे, समाजसेवक वसंत तांडेल, जयदेव मर्दे, भरत मर्दे, जगदीश मर्दे, डहाणू मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन अक्र े यांच्या उपस्थितीत मच्छीमार व्यवसायात जीवन व्यतीत केलेल्या चोवीस नाखवांचा सत्कार करण्यात आला.

विक्रमगडकरांनी साधला तिहेरी योग

विक्रमगड : श्रावणातील तिसरा सोमावर, रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा असा तिहेरी योग साधून पंतगेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच सर्वानीच मंदिरात मोठया संख्येने दर्शनासाठी व अभिषेकासाठी गर्दी केली
होती़

भाविकांनी पहाटेपासूनच तालुक्यातील विविध मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. त्यातच खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने बहिणींची धावपळ पहायला मिळाली. सकाळपासून बाजारपेठेमध्ये एकच गर्दी असल्याने व्यापाºयांसाठी पर्वणी ठरली.

अनेक श्रद्धाळूंनी दुपारनंतर ग्रहणाचे वेध सुरु होत असल्याने शिवमंदिरामध्ये विशेष पूजा अर्चना करुन प्रार्थना केली. बहिणींनी भावाच्या सौख्यासाठी प्रार्थना केल्या. एकंदरच सोमवारी आलेल्या रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर खंडग्रास चंद्र ग्रहणाचे सावट असले तरी हा दिवस विक्रमगडवासीयांनी तेवढ्याच उत्साहात साजरा केला.

Web Title:  Celebrate the full moon day with golden coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.