होळी, धुळवड उत्साहात साजरी

By admin | Published: March 14, 2017 01:30 AM2017-03-14T01:30:23+5:302017-03-14T01:30:23+5:30

या तालुक्यात व शहरात होळी, धुळवड शांततेत पार पडली़ ग्रामीण भागात व शहरी भाग मिळून अनेक गावपाडयांत होळयांचे पूजन करण्यांत आले़

Celebrate Holi, Dhulwad | होळी, धुळवड उत्साहात साजरी

होळी, धुळवड उत्साहात साजरी

Next

विक्रमगड: या तालुक्यात व शहरात होळी, धुळवड शांततेत पार पडली़ ग्रामीण भागात व शहरी भाग मिळून अनेक गावपाडयांत होळयांचे पूजन करण्यांत आले़ शहरीभागाच्या गल्ली बोळांत, सोसायटयांध्ये, बिल्डींग समोर तर शहरातील पूर्वीपासून जुनी असलेली ब वार्डातील तर ग्रामीण भागात मोकळया जागेत या होळया लावण्यांत आल्या़ होळीनंतर सकाळपासूनच धुलिवंदनाला सुरूवात झाली़ कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस ठाण्यातर्फे सांगण्यांत आले़ आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी,सारषी, दादडे,ओंदे आदीे ़ गावात एक गाव होळीची परंपरा पाळली गेली याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोटया मोठया होळया पेटविण्यात आल्या.
पहिले तिन दिवस छोटया होळया,चौथ्या दिवषी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच १२ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा करण्यात आला़ या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफलीचा आवाजही घुमत होता. चोरटया होळीसाठी तरुणांनी लाकडे भरपूर चोरली गावातील नवविवाहीत जोडपी होळीभोवती पाच फे-या मारतांना दिसत होती. प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडाली होती़ ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़ याच माळावर पाच दिवस विविध खेळ,गरबानृत्य,मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. व्यापारी एकत्र येवून नैसर्गीक रंग घालून तयार केलेल्या टाक्या घरघरापुढे नेऊन आतील मंडळींना रंगविण्यासाठी बाहेर बोलवितात. व नंतर संध्याकाळी नदीत स्रान करून परततात ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. (वार्ताहर)

मनोर परिसरात २४० होळया : या परिसरात सार्वजनिक ८० तर खाजगी १६० अशा एकूण २४० होळया पेटविण्यात आल्या टेन टाकव्हल, सावरखण्ड, करळगाव, दुर्वेस, सावरे, वेलगाव, या गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. होळीच्या मुख्य खांबावर वस्त्रांचे तुकडे बांधतात नंतर त्याला गाडले जाते, शेंड्यावर कोंबडीचे पिल्लू बांधतात. त्याभोवती गवत लाकडे रचून होळी पेटविण्यात आली. कोंबडचे पिल्लू पळविण्यासाठी बरीच झोंबाझोंबी झाली.


बोर्डी : बोर्डी परिसरात होळी पारंपरिक पद्धतीने पार पडली.तर धुळवडीला नैसर्गिक रंगाची उधळण करून इकोफेंडली धुळवडीची मजा नागरिकांनी लुटली. परिसरात रंगपंचमीपर्यंत उत्सव साजरा होणार आहे. धुळवडीच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. होळीचा सण लय भारी म्हणत ढोलताशांच्या नादात उत्साह शिगेला पोहचला होता. चिखले गावातील गावड भंडारी समाजात टाळ-मृदूंगच्या साथीने जुनी कवने, भारुड,ओव्या, गवळणी आदींची पर्वणी अनुभवायला मिळाली. आदिवासी समाजबांधवांनी तारपानृत्यावर फेर धरला होता. नव्या चालीत गायलेल्या गाण्यांनी ग्रामीण भागात शिमगोत्सवाचा आनंद दिसून आला.

Web Title: Celebrate Holi, Dhulwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.