पालघर जिल्ह्यात शिवजयंती दणदणीत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:46 AM2018-02-20T00:46:56+5:302018-02-20T00:47:02+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे दणदणीत साजरी करण्यात आली. कुठे ऐतिहासिक मिरवणुका, कुठे शोभायात्रा तर कुठे मोटारसायकलरॅली यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते

Celebrating Shiv Jayanti in Palghar | पालघर जिल्ह्यात शिवजयंती दणदणीत उत्साहात साजरी

पालघर जिल्ह्यात शिवजयंती दणदणीत उत्साहात साजरी

googlenewsNext

पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे दणदणीत साजरी करण्यात आली. कुठे ऐतिहासिक मिरवणुका, कुठे शोभायात्रा तर कुठे मोटारसायकलरॅली यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तर कुठे रक्तदान शिबिर तर कुठे रुग्णांना मोफत फळे वाटप असे सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले गेले होते.
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
जव्हार : येथे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यशवंत नगर येथील टॉवर नक्यावर उपनगराध्यक्ष पद्मा गणेश राजपूत व माजी बांधकाम सभापती गणेश राजपूत यानी ढोल वादनाचे आयोजन केले होते. शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ स्मारकाला नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी वंदन केले. या वेळी विरोधी पक्ष नेते दीपक कांगणे, नगरसेवक कुणाल उदावंत, रहीम लूलानिया, वैभव अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, मुख्याधिकारी वैभव विधाते होते. जव्हार एसटी कर्मचाºयांनी आयोजिलेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. यशराज मुरमे यांनी शिवरायांवर विचार व्यक्त केले.

मनोरला भव्य मोटारसायकल रॅली
मनोर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त येथे शिवशक्ती प्रतिष्ठान तर्फे भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसरातील दहिसर, खांबलोली गावात विविध कार्यक्र माचे आयोजन शिवसैनिकांनी केले होते. े उप सरपंच कैफ रईस यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुले, हार अर्पण केला व महाराजांच्या कार्याबद्दल विचार मांडले. या वेळी माजी उप सरपंच साजिद खतीब, सदस्य नितीन भोई, चेतन पाटील, संजय दातेला, दीपक जाधव उपस्थित होते तर सरपंच जागृती हेमाडे याची अनुपस्थिती होती.

बोईसर येथे शिवज्योत
बोईसर : सकल मराठा समाजातर्फे सकाळी तारापूरच्या किल्ल्यावर शिवज्योत काढण्यात आली. तर दुपारी पारशी ट्रस्ट मैदान ते बोईसर स्टेशन, नवापूर रोड, सकल मराठा कार्यालय, मधुर हॉटेल, ओस्तवाल, शिवाजी चौक, जिजाऊ चौक ते सर्कस मैदान या मार्गावर भव्य मिरवणुकीचे आयोजन झाले.
 

Web Title: Celebrating Shiv Jayanti in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.