विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:51 PM2019-02-01T22:51:10+5:302019-02-01T22:51:25+5:30

नातेवाइकांची होते कुचंबणा; खाजगी रुग्णालयांचा घ्यावा लागतो आधार

The cemeteries for the insolvency closed for several months | विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

googlenewsNext

वसई : अनेकदा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वा इतर कारणास्तव नातेवाईक अंत्यविधिसाठी येण्यासाठी निश्चीत कालावधी नसताना मृतदेह शवागारात ठेवण्याचा पर्याय नातेवाईकांसमोर असतो. मात्र, विरार येथे जिल्हा रूग्णालयाचे एकच शवागार असून ते सुद्धा काही महिन्यापासून नुतनीकरणासाठी बंद असल्यामूळे आता आपत्कालीन स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

जिल्हा रूग्णालयामार्फत विरार पश्चिमी विराट नगर येथील हिंदू वैकूंठधाम येथे २००६ साली शवागाराची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षात या शवागाराच्या विद्यूत यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्यामूळे हे शवागार बंद करण्यात आले होते. नविन निविदा मागविल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून या शवागाराचे नव्याने नुतनीकरण सुरू झाले. त्यामूळे जुनी यंत्रणा बाहेर अडगळीत काढण्यात आली आहे. नुतनीकरण सुरू आहे. मात्र, धिम्या गतीने सुरू असल्यामूळे दु:खद प्रसंगी मृतदेह या शवागारात ठेवता येऊ न शकल्यामूळे नाईलाजास्तव खाजगी रूग्णालयातील शवागारात न्यावा लागत आहे.

आगस्ट २०१७ ला या शवागाराच्या नुतनीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु दीड वर्षे उलटूनही अजून शवागाराची विद्युत यंत्रणा सुरळीत झालेली नाही. या शवागारात अपघाती मृत्यू पावलेले, बेवारस मृतदेह तसेच जवळचे नातेवाईक अंतविधीसाठी येईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी वापर करीत होते. विरारमधील एकमेव जिल्हा रूग्णालयाचे शवागारच बंद असल्यामूळे संजीवनी रूग्णालय विरार किंवा कार्डिनल ग्रेसियस हॉस्पीटल, बंगली येथे मृतदेह शवागारात न्यावे लागत आहेत.

महापालिका आयुक्यांची भूमिका...
वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापना होऊन दहा वर्ष होत आली तरी, पालिकेचे स्वत:चे शवागार नसल्यामूळे वसई, विरार व नालासोपाऱ्यात अद्ययावत पालिकेचे शवागार बनविण्यात यांनी अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेचे स्वत:चे शवागार नसले तरी जिल्हा रूग्णालयाला याबाबत लागेल ती मदत शवागारासाठी पालिका देत असल्याचे सांगीतले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे अधिकार जिल्हा रूग्णालयाला असल्यामूळे आपण फक्त त्यांना मदत पूरवू शकतो, हे शवागार पालिकेकडे देण्यात यावे असा प्रस्तावही पाठविल्याचे त्यांनी सांगीतले.

विराट नगर स्मशानभूमीत एकमेव शवागार आहे. तेही नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे. दु:खद प्रसंगी नागरिकांना खाजगी रूग्णालयात धाव घेत शवागारात मृतदेह ठेवावे लागत आहेत.
- अभिजीत चौधरी,
सामाजीक कार्यकर्ते, विरार

महानगरपालिकेचे स्वत:चे शवागार नसले तरी जिल्हा रूग्णालयाच्या शवागारासाठी लागेल ती मदत प्रशासन वेळोवेळी देत असते. हे शवागार पालिकेकडे देण्यात यावे असा प्रस्ताव पाठवला आहे.
- सतीष लोखंडे, आयुक्त, वसई विरार महापालिका

Web Title: The cemeteries for the insolvency closed for several months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.