स्मशानभूमीचा वापर चेंजिंग रूमसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:27 AM2018-11-15T05:27:04+5:302018-11-15T05:27:44+5:30

भुईगाव पर्यटनाची व्यथा : प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी एकच पर्याय

Cemeteries use the changing room | स्मशानभूमीचा वापर चेंजिंग रूमसाठी

स्मशानभूमीचा वापर चेंजिंग रूमसाठी

Next

वसई : येथील निसर्गरम्य समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावत असतो. मात्र येथे पर्यटकांसाठी योग्य सोयीसुविधा नसल्यामुळे चक्क पर्यटक कपडे बदलण्यासाठी स्मशानभूमीच्या आडोशाचा वापर करतांना दिसत आहेत. वसईतील भुईगाव समुद्रकिनारी असलेली स्मशानभूमी सद्या पर्यटक व ‘प्री वेडिंग शूट’ करणारे चेंजींग रूमसारखा वापर करताना दिसत आहेत.

वसईतील भुईगाव समुद्रकिनारा हा असाच निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर दररोज शेकडो पर्यटक येत असतात. मात्र त्यांना कसल्याच सोयीसुविधा याठिकाणी मिळत नाहीत. अनेक जण या किनाºयावर छायाचित्रणासाठी येत असतात. त्याचप्रमाणे ‘प्री वेडिंग शूट’ म्हणजे लग्नापूर्वीच्या छायाचित्रणासाठी येथे जोडपी येत असतात. विविध पेहरावातील छायाचित्रणासाठी कपडे बदलणे आवश्यक असते. मात्र किनाºयावर प्रसाधनगृह अथवा विश्रांतिगृह नाही. त्यामुळे या किनाºयाजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर कपडे बदलण्यासाठी केला जात आहे. स्मशानभूमीत कसलीच सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळे लोकांचा या स्मशानभूमीत वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान करण्यासाठी तरुणांचा घोळका स्मशानभूमीत येतो, अशी माहितीही ग्रामस्थांनी दिली. गावातील नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीचा असा वापर होत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.

...तर टाळे लावू - चोरघे

च्येथे जोडपे येत असल्याने शुटींग दरम्यान त्यांचे अश्लिल चाळे सुरु असतात. मात्र, तेथे त्यांना सुविधा दिल्यास तो त्रास कमी होऊ शकतो.
च्याबाबत नगरसेवक पंकज चोरघे म्हणाले की, स्मशान भूमीचा गैरवापर होत असेल तर टाळे लावून सुरक्षा रक्षक नेमावा लागेल.
 

Web Title: Cemeteries use the changing room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.