दाखलेवाटप शिबिर

By admin | Published: June 16, 2016 12:37 AM2016-06-16T00:37:32+5:302016-06-16T00:37:32+5:30

महाराजस्व अभियानांतर्गत जैन मंदिर येथे विविध दाखले वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ८० दात्यांनी ३६ बाटल्या रक्तदान केले. महाराष्ट्र ब्लड बँंक ट्र

Certificate camp | दाखलेवाटप शिबिर

दाखलेवाटप शिबिर

Next

खानिवडे : महाराजस्व अभियानांतर्गत जैन मंदिर येथे विविध दाखले वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ८० दात्यांनी ३६ बाटल्या रक्तदान केले. महाराष्ट्र ब्लड बँंक ट्रस्ट पालघर यांच्या माध्यमातून डॉ राजेंद्र चव्हाण यांच्या देखरेखे खाली हे शिबीर पार पडले. तर दाखले वाटप शिबिरात मांडवी महसूल मंडळाच्या सात तलाठी सजा व ३५ गावातील नागरीकांना उत्पन्न, जेष्ठ नागरिक, रहिवास, जातीचे असे विविध १२०० दाखले देण्यात आलेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रेशनकार्ड व भूसंपादन धनादेश यांचे वाटप करण्यात आले. १३ मे रोजी झालेल्या या कार्यक्र मासाठी आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, प्रांताधिकारी दादाराव दातकर,तहसीलदार गजेंद्र पाटोळे, नायब तहसीलदार हरिश्चंद्र जाधव, मंडळ अधिकारी शशिकांत पाटील व तिडके तलाठींसह सर्व तलाठी व महसूल मंडळ विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Certificate camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.