वसईमध्ये चेन स्रॅचर्सची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:39 AM2018-09-15T02:39:04+5:302018-09-15T02:39:10+5:30
नाकाबंदी व तपासणीसाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असतांनाही चेन स्नॅचिंग झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त के
वसई: गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी एका महिलेचे भर दिवसा चेन स्नॅचिंग करून माणिकपूर पोलिसांनी उत्सवकाळात उभारलेल्या सुरक्षा फळीला आव्हानच दिले आहे.
नाकाबंदी व तपासणीसाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असतांनाही चेन स्नॅचिंग झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरु वारी दुपारी कौल सिटी मधील दोषी व अग्रवाल गृहसंकुल येथून आपल्या गोरेगाव येथील घरी परताना एक ५१ वर्षीय गृहिणीला रस्त्यावरून जात असताना मागून दुचाकीवर स्वार होऊन आलेल्या दोघा चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन जबरीने खेचून पोबारा केला.
दरम्यान, घटना घडल्यावर त्या महिलेने आरडाओरड केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या मिहलेच्या मुद्देमालाची किंमत लाखोंच्या आसपास जात असून या चेन स्नॅचिंग मुळे ती प्रचंड दहशतीमध्ये आहे. या प्रकरणी पिडित महिलेच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी दोघा अज्ञातांवर विविध कलमानव्ये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्हा लागले आहे.
गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचा संशय
वरचेवर वसई- विरारच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असून ही बाब दिवसेंदिवस गंभीर बनताना दिसते आहे. छोट्या -माठ्या चोऱ्या, घरफाड्या, दरोडे, आत्महत्या, खून आदी गुन्हे व त्यातच दोन महिन्यापासून मुलामुलींचे बेपत्ता व अपहरण वाढले आहे.
वसई, माणकिपूर ,नालासोपारा , वालिव, विरार आदी भागात असे चेन स्नॅचिंग चे प्रकार सतत डोकं वर काढत असल्याने वसई विरार भागात एकच चेन स्नॅचिंग करणारी टोळी कार्यरत असल्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे.