महिलेच्या गळ्यावर चाकूनं वार करणारा सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:57 AM2018-12-03T08:57:01+5:302018-12-03T09:33:08+5:30

शेतातील काम करुन घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यावर तिच्यावर गळ्यावर चाकूनं वार केले.

chain snatcher arrested by Police who brutally attacked woman in Dahanu | महिलेच्या गळ्यावर चाकूनं वार करणारा सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात 

महिलेच्या गळ्यावर चाकूनं वार करणारा सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात 

Next
ठळक मुद्देसोनसाखळी चोरानं महिलेच्या गळ्यावर केले चाकूनं वारमहिलेची प्रकृती स्थिर, गळ्यावर पडले 16 टाकेस्थानिकांनी आरोपीला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

डहाणू/बोर्डी - शेतातील काम करुन घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यावर तिच्यावर गळ्यावर चाकूनं वार केले. सुदैवानं या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली आहे. अशोक वाघेला असे आरोपीचं नाव आहे. डहाणूमध्ये रविवारी (2 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर सोमवारी पहाटे स्थानिकांनी आरोपीला शहरातील सेंट मिरीज हायस्कुलजवळ पकडले. मात्र वाणगाव पोलिसांना तात्काळ खबर देऊनही, ते उशिरा पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.

सारिका बारी असे या हल्ला करण्यात  आलेल्या महिलेचं नाव असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने सारिका यांच्या शेतावर गेला होता. तिने हटकल्यावर तो तिथून निघून गेला. मात्र ती घराकडे निघाली असता, त्याने तिचा पाठलाग करून सोनसाखळी चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यात झटपट होऊन तिने चोरीचा डाव हाणून पाडताच, त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केले आणि तो पसार झाला. 

ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका ग्रामस्थानं पाहिले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात तिच्या गळ्याला तब्बल 16 टाके पडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पोलिसात तिनं दिलेल्या फिर्यादीनुसार गावाशेजारी राहणारा अशोक वाघेला या हल्ल्यामागे असल्याची माहिती समोर आली. यानंतर स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला आणि पहाटे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला.
 

Web Title: chain snatcher arrested by Police who brutally attacked woman in Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.