खैरांची तस्करी रोखण्याचे आव्हान;वाहनचालक, मालक, तस्कर जातात निसटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 02:34 AM2018-01-21T02:34:59+5:302018-01-21T02:35:06+5:30

या तालुक्यात गेल्या वर्षभरापासून खैरांची कात काढून विक्र ी करणारी टोळी सक्रिय आहे. कात काढलेल्या खैरांलो चांगला भाव मिळत असल्याने, वनविभागाची नजर चुकवून त्याच्या विक्रीचा विक्रीचा धंदा तेजीत आहे.

Challenge to prevent smuggling; driving, owner, smugglers, escape | खैरांची तस्करी रोखण्याचे आव्हान;वाहनचालक, मालक, तस्कर जातात निसटून

खैरांची तस्करी रोखण्याचे आव्हान;वाहनचालक, मालक, तस्कर जातात निसटून

Next

- हुसेन मेमन

जव्हार : या तालुक्यात गेल्या वर्षभरापासून खैरांची कात काढून विक्र ी करणारी टोळी सक्रिय आहे. कात काढलेल्या खैरांलो चांगला भाव मिळत असल्याने, वनविभागाची नजर चुकवून त्याच्या विक्रीचा विक्रीचा धंदा तेजीत आहे. या टोळीची पाळेमुळे खणून काढणे हे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे.
या टोळीमुळे दिवसेंदिवस जंगल उध्वस्त होतांना दिसत आहे. जव्हार वनविभागाने या टोळीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून, त्यांची दिवसरात्र गस्त या परिसरात तैनात केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.
या तालुक्यात उत्तर व दक्षिण असे दोन वनविभाग आहेत. या जंगल परिसरातील वनप्लॉट, एकसाली प्लॉट, मालकी हक्क या क्षेत्रातील खौरांची तोड करून राजरोसपणे विक्र ी केली जात आहे.
या तालुक्यातील दसकोड, पळशीन, वावर वांगणी, रु ईघर बोपदरी, झाप हेदोली, पिंपळशेत खरोंडा, घिवंडा, या भागात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिक आहे. त्यातच गेल्या वर्षी देखील खैरांची तस्करी करणारे टेम्पो, ट्रक, पकडण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र नेहमीप्रमाणे वाहन आणि मुददेमाल हाती आला पण चालक व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन अथवा गुंगारा देऊन पळून गेले असे नेहमीप्रमाणे घडते आहे. त्यामुळे त्या मुद्देमालाचा उपयोग होत नाही. दसकोड, पळशीन भागात वनविभागाने खैरांची साल काढलेला माल जप्त केला पण तो बेवारस दाखवून जव्हारच्या डेपोत जमा करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत दसकोड पैकी पळशीन या वनविभागाच्या जंगल वनक्षेत्रात खैरांची साल काढलेले ओंडके सापडले आहेत. ते नदी, नाला, जंगल झुडुपात लपविलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच खैरांची साल काढलेल्या ओंडक्यापासून गुटक्यासाठी लागणारा काथ बनविला जात असल्याने, मार्केटमध्ये त्याची ४० ते ५० रुपये किलोने विक्र ी होते. त्यामुळे या खैरांच्या तस्करीत या टोळयांना अमाप पैसा मिळत आहे. साल काढलेला खैरांचे ओंडके सिल्वासा, वापी, या ठिकाणी जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वनविभाग या टोळयांना गजाआड करण्याच्या प्रयत्नात आहे.

जंगलतोड आणि खैर तोड करणा-या टोळीला वनविभागाने पकडून त्याला मोठी शिक्षा करावी म्हणजे त्यामुळे जंगले व वने वाचतील.
- रतन बुधर
माकपा, राज्य सेक्रेटरी

Web Title: Challenge to prevent smuggling; driving, owner, smugglers, escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.