शिवसेनेपुढे विरोधकांसह बंडखोराचेही आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:36 PM2019-03-13T23:36:53+5:302019-03-13T23:46:04+5:30

नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे.

Challenge of rebellion with the opponents of Shiv Sena | शिवसेनेपुढे विरोधकांसह बंडखोराचेही आव्हान

शिवसेनेपुढे विरोधकांसह बंडखोराचेही आव्हान

Next

पालघर : नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे. इथे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला सेनेच्या बंडखोर उमेदवारा बरोबरीनेच काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन आघाडीच्या उमेदवारांचाही सामना करावा लागणार आहे.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट न दिलेल्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आपले बंडखोरी मागे घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख, आमदार रवींद्र फाटक यांचे आवाहन बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पायदळी तुडवले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील, आघाडी कडून डॉ. उज्वला काळे यांच्या बरोबर अपक्ष अंजली पाटील यां तिघांमध्ये नगराध्यक्षपदा साठी लढत रंगणार आहे. माजी नगराध्यक्ष अंजली पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून त्या रिंगणात उतरल्या नंतर नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनाही उमेदवारी नाकारली गेली असून अशा शिवसैनिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरांच्या पक्षांचे पॅनल शिवाजी महाराजांच्या नावाने समोर येत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे अनेक प्रभागात शिवसेना अधिकृत विरु द्ध शिवसेना बंडखोर व आघाडी असा तिरंगी सामना पहावयास मिळणार आहे. पालघर नगर परिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणातील बंडखोरी प्रथमच पहावयास मिळत आहे.

पालघर नगर परिषदेसाठी ७२ उमेदवार रिंगणात
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ११ पैकी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ३ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारांपैकी ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

यातील प्रभाग क्र मांक 6 अ मध्ये एका अपक्ष उमेदवारांनी आपलं अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे कैलास म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग ६ ब मध्ये उमेदवारीच्या अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिल्याने या प्रभागातील स्थिती न्यायालयाच्या निर्णया नंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Challenge of rebellion with the opponents of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.