डहाणूतील दररोजचा १२ टन कचरा पालिकेसाठी आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:34 PM2017-12-24T23:34:44+5:302017-12-24T23:34:56+5:30
५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो.
शौकत शेख
डहाणू : ५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो. मात्र डहाणूचा डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेले भाजपचे नगराध्यक्ष हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याकडे रहिवासी डोळे लाऊन बसले आहेत.
डहाणू नगरपरिषद स्थापन होऊन ३२ वर्षे होत आहेत. या कालावधीत बारा मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र, अद्याप डहाणू नगर परिषदेला शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत: च्या मालकीचे डिम्पंग ग्राऊंड निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे शहरात दररोज साठणारा १२ टन कचरा कुठे टाकावा, अशी गंभीर समस्या नगरपालिका प्रशासनापुढे उभी राहिली आहे.
पर्यायान सध्यास्थीतीत लोणपाडा, सरावली येथे उघड्यावर कचरा डंप केला जात आहे. मात्र, त्यामुळे रहिवासी वस्ती त्रस्त झाल्याने नागरिकांकडून तक्र ारीचा सुर निघत आहे. कचºयामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे.
डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये पालिकेत रूपांतर केले. राज्यात शेती बागायती, चिकूची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर स्वच्छेच्याबाबतीत अस्वच्छ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
साचणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाकडून शहरात महसूल विभागाच्या मालकीची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
शिवाजीनगर सरावली, सावटा, मानफोड पाडा आणि लोणपाडा परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कचरा टाकल्यानंतर त्यावर जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने हे डंम्पिग ग्राऊंड त्वरीत बंद करावे , अशी मागणी होऊ लागली आहे. निवडून आलेले नवे चेहरे ही समस्या कशी हातळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.