चैन पडेना आम्हाला...
By admin | Published: October 11, 2016 02:28 AM2016-10-11T02:28:03+5:302016-10-11T02:28:03+5:30
संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ
पालघर : संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ तालुक्यातील ८२० खाजगी आणि सार्वजनिक नवरात्रौ मंडळातील मुर्त्यांचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा ह्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षिकेसह १ हजार ३४१ अधिकारी कर्मचारी, शीघ्र कृती डाळ,दंगल नियंत्रण पथक सज्ज झाले आहेत.
१ आॅक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरवात झाल्यानंतर, दांडियाची सुरु असलेली धूम,पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी हल्ल्याचा दिलेला इशारा, ह्यामुळे ह्या सणावर दहशतवादाचे सावट राहिल्याने पालघर पोलीस प्रशासन सज्ज झाले होते.दहा दिवस पोलिसांनी डोळ्यात तेल घालून संशयास्पद गोंष्टीसह,गर्दी,वाहतूक,ई. वर बारकाईने लक्ष दिल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.उद्या दसऱ्याच्या सणा सह नवदुर्गा मातेच्या मुर्त्यांचे विसर्जन हि जिल्ह्यात होणार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपने पार पडावा ह्या साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
पालघरच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३६ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, ९५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी, एक प्लाटून, शीघ्र कृती दलाचे एक प्लाटून,दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून,अशी पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
उद्या दसरा असल्याने भाताची कणसे,आंब्याची पाने,झेंडूची फुले ह्यांनी बनविलेल्या तोरणा साठी,केळीचे खांब,हार,फुले,फळे ह्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे ह्या सर्वांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.मात्र हिंदू समाज हा उत्सव प्रिय असल्याने खरेदी मध्ये कुठेही तडजोड होत असल्याचे दिसून आले नाही. भाताच्या कणसांची विक्री करण्यासाठी पालघरसह, केळवे, सफाळे, मनोर, बोईसर ई भागातील आदिवासी महिला पालघरच्या बाजारपेठे सह रस्त्या रस्त्यावर बसलेल्या दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)