इंटरसिटी एक्सप्रेसला कनेक्टेड लोकलच्या वेळेत पुन्हा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:59 PM2019-07-22T22:59:10+5:302019-07-22T22:59:33+5:30

प्रवासी संतप्त : रेल्वे प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलन

Change in time of connected local time to Intercity Express | इंटरसिटी एक्सप्रेसला कनेक्टेड लोकलच्या वेळेत पुन्हा बदल

इंटरसिटी एक्सप्रेसला कनेक्टेड लोकलच्या वेळेत पुन्हा बदल

Next

वसई : पश्चिम रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजता निघणाऱ्या इंटरिसटी एक्सप्रेसला कनेक्टेड असलेल्या लोकलची वेळ आणि फलाट सतत बदलले जात असल्याने भार्इंदरपासून नालासोपाºयापर्यंतच्या प्रवाशांना तास ते दीड तास आधीची लोकल पकडून विरारला जावे लागते. विशेषत: महिला प्रवाशांची यामुळे मोठी ओढाताण होते. रेल्वे प्रशासनाच्या या कारभारा विरोधात प्रवासी वर्गात तीव्र संताप आहे. दरम्यान मीरा-भार्इंदर ते नालासोपारा या भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी पालघर -बोईसर- डहाणू येथे नोकरी धंद्यानिमित्त जात असतात. या सर्वांना बांद्रा येथून निघून बोरिवली, विरार, बोईसर, वापी, वलसाड व सूरतपर्यंत जाणारी इंटरिसटी एक्सप्रेस अगदी सोयीची पडते.

ही इंटरिसटी एक्स्प्रेस विरार फलाट क्र मांक ४ वरून सकाळी ८ वाजता निघते. यासाठी नालासोपाºयावरून ७:४४ ची लोकल इंटरिसटी पकडण्यासाठी योग्य असल्याने बहुतांश प्रवासी ती पकडायचे, पण चार महिन्यांपासून ही लोकल आता विरार यार्डातून सरळ मुंबईसाठी रवाना होऊ लागली. त्यामुळे नालासोपाºयातून ७.४४ ची लोकल पकडणारे प्रवासी ७.३६ ची लोकल पकडू लागले. त्यातच ७.४४ वा. नंतर ७.४७ ची नालासोपाºयात येणारी लोकल आहे. पण ही लोकल सिग्नलला थांबत असल्याने आणि विरार मध्ये फलाट क्रं. १ वर जात असल्याने तेथून ४ नं. फलाटावर येणारी इंटरिसटी पकडणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी १६ मिनिटे आधीची ७.३६ ची लोकल पकडू लागले. ही लोकल आणि इंटरसटी एक्स्प्रेस याचा मेळ प्रवाशांना बसवेपर्यंत पुन्हा यात बदल झाला.

पुन्हा फलाट व लोकलच्या वेळेत बदल !
नालासोपाºयाला ७.३० वाजता येणाºया लोकलची वेळ ७.३२ केली आहे, तर ७:३३ ची ७.३६ केली. ७.३६ ची वेळ ७.२८ वा. केली गेली आणि ७.४७ ची थेट ७.५१ ची केली. याहूनही गंभीर म्हणजे, या आधीची ७.३६ वाजताची लोकल ही विरारमध्ये फलाट क्र .३ वर जायची आणि आता ही लोकल फलाट क्र. २ वर जात आहे.

विरार येथून इंटरिसटी एक्स्प्रेस पकडणाºया प्रवाशांप्रमाणेच ७.४० वा.ची शटल पकडणाºया शेकडो प्रवाशांचेही खूप हाल होतात.
ते प्रवासी नालासोपाºयावरून ७.२४ ची लोकल पकडायचे. ती आता यार्डातून मुंबईसाठी रवाना केली जाते आहे, त्यामुळे शटल पकडण्यासाठी प्रवाशांना नालासोपारातून ७.१९ वाजताची लोकल कुठल्याही परिस्थितीत पकडावीच लागते.

Web Title: Change in time of connected local time to Intercity Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे