मतदानाच्या तारखेसोबत बदलली समीकरणेही, सोशल मीडियावर जोरात चचा, धनाढ्य उमेदवार बेफिकीर तर इतर मात्र हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:42 AM2017-12-10T05:42:29+5:302017-12-10T05:42:42+5:30
निवडणूकीची तारीख बदलल्यानंतर काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आनंदही व्यक्त केला काही म्हणाले एकादाची होऊन गेली असती लवकर तर सुटलो असतो.
हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : निवडणूकीची तारीख बदलल्यानंतर काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आनंदही व्यक्त केला काही म्हणाले एकादाची होऊन गेली असती लवकर तर सुटलो असतो. तर काही म्हणाले, बरे झाले माझी तयारी नव्हती झाली ती आता होऊन जाईल. यामुळे मतदानाचा दिनांक पुढे ढकलला गेल्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी आता समिकरणेही बदलण्याची शक्यता आहे. याबाबत सोशल मिडीयावर जोरात चर्चा रंगली आहे.
१३ तारखेला होणारे मतदान आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १७ तारखेला होणार आहे. यामुळे अगदी प्रमुख प्रचारकरांच्या सभा घेतलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र बुचकळ्यात पडले आहेत. शिवसेनेने तिची शुक्रवारी होणारी सभा रद्द केली असून ती मतदानाच्या दोन दिवस आधी होेण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत निवडणूक जवळ आली म्हणून कार्यकर्ते बॅनर, प्रचार, पार्ट्या यांच्यावर अधिक खर्च केलेल्या उमेदवारांचा मात्र हिरमोड झाला असून हा खर्च आणखी चार दिवस करावा लागणार असल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. तर आता आखलेली रणनीती बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे काही उमेदवारांची प्रचाराची आणि पैशांचाही तयारी झालेली नव्हती अशा उमेदवारांना मात्र आता ती करण्याची संधी मिळाली असून त्याना आनंद झाला आहे.
एकूणच या लांबलेल्या मतदानाबाबत कुठे खुशी कुठे गम
अशी परिस्थिती दिसून येत असून
पुन्हा राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यात येणार आहेत तर काहीनी प्रचारात थंडाई केली असून आता खूप वेळ असल्याने खर्चावर अंकुश आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. तर दुसरीकडे या राहीलेल्या दिवसांत बरीच राजकीय समीकरणे घडण्या बिघडण्याची शक्यता आहे.
तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून उमेदवाराच्या मागे फिरणाºया कार्यकर्त्यांचाही धंदा तेजीत राहणार आहे. कार्यकत्याचा व पाठिराख्यांचा असे की, प्रचारासाठी जे कार्यकर्ते व पाठीराखे आहेत ते आलटून पालटून म्हणजेच आज या उमेदवाराकडून तर उद्या त्या उमेदवार सोबत असे चित्र दिसत आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की समर्थक व पाठीराखे भाड्याने घेवून उमेदवार प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.
जो सधन उमेदवार आहे त्याला मतदानाची तारीख बदलल्यामुळे फारसा फरक पडला नसेल, परंतु जो जेमतेम आर्थिक स्थितीतला उमेदवार आहे, त्याला प्रचारासाठीचा अतिरिक्त खर्च न परवडण्यासारखा आहे. या वाढलेल्या चार दिवसांत आता प्रचंड खर्च करावा लागेल हे मात्र निश्चित. हा खर्च जे निवडून येतील त्यांच्या पथ्यावर पडेल आणि जे निवडून येणार नाहीत त्या पैकी एखाद्याला पश्चाताप करायला लावेल अशी चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे.