महिलेकडून १५ लाख ७५ हजारांचा चरस जप्त

By धीरज परब | Published: August 8, 2022 03:14 PM2022-08-08T15:14:01+5:302022-08-08T15:14:29+5:30

मीरारोडच्या तिवारी इंजिनियरिंग कॉलेज व सेवन इलेव्हन क्लब परिसरात असलेल्या मार्गावर केडी एम्पायर नावाची इमारत आहे .

Charas worth 15 lakh 75 thousand seized from woman | महिलेकडून १५ लाख ७५ हजारांचा चरस जप्त

महिलेकडून १५ लाख ७५ हजारांचा चरस जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोड मध्ये १५ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ३ किलो चरस साठ्यासह एका महिलेस अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे . 

मीरारोडच्या तिवारी इंजिनियरिंग कॉलेज व सेवन इलेव्हन क्लब परिसरात असलेल्या मार्गावर केडी एम्पायर नावाची इमारत आहे . सदर इमारतीच्या मार्गावर एक महिला चरस ह्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षातील शिपाई ए . बी.  यादव यांना मिळाली . त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यावर निरीक्षक देविदास हंडोरे , सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे व विलास कुटे सह यादव , पावन पाटील , पी . डी . टक्के , डी . एस . इंगळे , व्ही. ए . घरबुडे  यांच्या पथकाने के डी एम्पायर इमारत परिसरात सापळा रचला . त्यावेळी  फ्युजन डिलाईट केक दुकानासमोर रिक्षातून संशियत महिला उतरताच पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतले . 

अटक महिलेचे नाव शहनाज सलीमुद्दीन शेख उर्फ सना (३०) रा . रा. रमाबाई चाळ, माशाचा पाडा, काशीमीरा  असे असून तिच्या कडील पर्स मधून ३ किलो १६५ ग्राम वजनाचे व १५ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चरस हे अमलीपदार्थ सापडले . पोलिसांनी चरस सह तिचा मोबाईल जप्त करून मीरारोड पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे . पोलीस पुढील तपास करत आहे . 

Web Title: Charas worth 15 lakh 75 thousand seized from woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.