चार शाळांविरोधात गुन्हा दाखल, संस्थाचालकांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:39 PM2020-02-21T23:39:04+5:302020-02-21T23:39:25+5:30
शिक्षण विभाग आदेशाचा अवमान : संस्थाचालकांचे धाबे दणाणले
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार वसई पूर्वेकडील विभागातील एकूण चार शाळांच्या संस्था चालकांना गटशिक्षणाधिकारी यांनी नोटीस बजावली होती, पण या संस्था शिक्षण विभागाच्या आदेशाचा अपमान केला म्हणून वालीव पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अनधिकृत शाळा आणि शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वीही अनेक शाळांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी माधवी चेतन तांडेल (४१) यांनी पालघर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार २२ मे २०१९ अन्वये पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना शाळा बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले असतानाही वसई पूर्वेकडील गोखिवरे, गावराईपाडा येथील प्रेम बालिका योगेंद्र प्रताप सिंहद्वारा चालवल्या जाणाऱ्या शारदा निकेतन स्कूल (इंग्रजी माध्यम), गोखिवरे, गावराईपाडा येथील प्रेम बालिका योगेंद्र प्रतापसिंहद्वारा चालवल्या जाणाºया शारदा निकेतन स्कूल (हिंदी माध्यम), चिंचोटी येथील लोहारपाडा परिसरातील मारुती एज्युकेशन ट्रस्टची ए.डी.वाय. स्कूल, चिंचोटी येथीलच फहीम खान एज्युकेशन ट्रस्टची एफ.के. अकॅडमी स्कूल या चारही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षण संस्था चालकांना नोटीस बजावूनदेखील नमूद शाळांचे संस्थाचालक यांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून माधवी तांडेल यांनी गुरुवारी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन चारही शाळांविरोधात तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जे बेकायदा शाळांचे पीक आले आहे. अवैध शाळा या केवळ व्यवसाय हे एकमात्र निमित्त ठेवून स्थापन करण्यात आल्या आहेत. कारण अवैध शाळांत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यदेखील शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवरच केली जात असते.
मुलांच्या भविष्याचे काय?
च्वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा आकडा डोळे दिपवणारा आहे.
च्या शाळांत किती हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.