तिळसेश्वराचा जयकार!
By admin | Published: February 25, 2017 03:02 AM2017-02-25T03:02:33+5:302017-02-25T03:02:33+5:30
महाशिवरात्री निमित्ताने आज तालुक्यातील येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
वाडा : महाशिवरात्री निमित्ताने आज तालुक्यातील येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी ‘जय जय शिवशंकरा’च्या जय घोषाने परिसर दणाणुन सोडला. त्याच प्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सपत्नीक तिळशेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे आहेत. अशी पुर्वापार श्रद्धा असल्याने त्यांना बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यात्रेत भाविकांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने पाणी व सरबत, शिवसेनेच्यावतीने पाणी व फराळीची सोय केली होती. गुडलक यंग स्टार क्लबच्या वतीने सुद्धा पाणी व सरबताची सोय केली होती. तर भाजपाच्यावतीने पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.
भाविकांसाठी वाडा आगारातून पाच दहा मिनिटांनी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तिळसे ग्रामस्थांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. येथे पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली. (वार्ताहर )