रासायनिक प्रदूषण आता धरण क्षेत्र, शेतापर्यंत!, जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:27 AM2020-07-10T01:27:34+5:302020-07-10T01:28:11+5:30

देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध आजारांना बळी पडत आहे.

Chemical pollution is now heading towards the dam area, to the farm !, a fatal accident | रासायनिक प्रदूषण आता धरण क्षेत्र, शेतापर्यंत!, जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने वाटचाल

रासायनिक प्रदूषण आता धरण क्षेत्र, शेतापर्यंत!, जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने वाटचाल

Next

- हितेन नाईक
पालघर : नदीनाल्यांपुरती मर्यादित राहिलेली रासायनिक प्रदूषणाची गंभीर बाब आता थेट धरण क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचली आहे. काही कारखानदारांच्या संगनमताने प्रदूषणमाफियांचे सुरू असलेले हे अतिरेकी कृत्य जिल्ह्यात जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने चालविलेले एक मोठे पाऊल आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच या प्रदूषणाला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध आजारांना बळी पडत आहे. याबाबत तक्रारींनंतर थातूरमातूर कारवाईव्यतिरिक्त जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नाही. हरित लवादात प्रदूषणाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर काही कंपन्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती, मात्र काही दिवस कंपनीचे उत्पादन बंद करून काही हजारांचा दंड भरून या कंपन्या पुन्हा प्रदूषण वाढवायला सज्ज होत असल्याचे दिसून आलेले आहे. या कंपनीमालकांच्या मागे काही राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांसोबत अनेक घटक छुपा पाठिंबा फक्त लेबर कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट, प्रशासन-कंपनीमालकांमधील मध्यस्थी आदीच्या फायद्यासाठी करीत असल्याने काही कंपनीमालक कुठलीही भीती न बाळगता प्रदूषित पाणी, घनकचरा आता सार्वजनिक ठिकाणे, शेतात, धरण क्षेत्रात सोडायला मोकळे झाले आहेत. धरण क्षेत्रात ज्वलनशील घातक रसायन पाणीपुरवठा करणाºया धरणात मिसळल्यास मोठ्या जीवितहानीची घटना घडू शकते. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमधून चोरट्या पद्धतीने रासायनिक घनकचरा व रसायनाची वाहतूक होत असल्याचे पुरावे तारापूरमधील रहिवासी हेमेंद्र पाटील यांनी पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेक वेळा दिले आहेत.

तक्रारदारांनी दिलेल्या अनुषंगाने पाचपैकी चार कारखान्यांना क्लोजर नोटीस बजावल्याने ते बंद आहेत. घातक घनकचºयासंदर्भात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, तारापूर

जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या पत्राची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयात संबंधित अधिकाºयांची आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. प्रदूषणाला छुपा पाठिंबा देणाºया अधिकाºयाविरोधात आता पुरावे सादर करण्यात येणार आहेत.

वेंगणी गावातील शेतात अनेक दिवसांपासून रसायन भरलेले ड्रम असल्याच्या तक्रारी २० जून रोजी स्थानिकांनी केल्या. मात्र, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले होते.

Web Title: Chemical pollution is now heading towards the dam area, to the farm !, a fatal accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.