डहाणूच्या बाजारात चेन्नईचा आंबा, प्रतिकिलो १६० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:56 PM2019-03-11T22:56:31+5:302019-03-11T22:57:05+5:30
युरोपातील निर्यातीसाठी २९ बागायतदार सज्ज; स्थानिक खवय्यांकडून खरेदीला प्राधान्य, चव उत्तम असल्याची चर्चा
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : डहाणूच्या फळ बाजारात चैन्नईहून लालबाग नावाच्या आंब्याची आयात करण्यात आली असून त्याची १६० रु पये प्रतिकिलोने विक्री सुरू आहे. या जातीचे फळ आमरसाकरिता प्रसिद्ध असून त्याचा आस्वाद खवय्यांकडून घेतला जात आहे. तर मे महिन्याच्या मध्यात स्थानिक फळे पक्व होण्याची शक्यता असून २९ बागायतदारांनी युरोपीय देशात निर्यातीकरिता तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून एजन्सीकडे नोंदणी केली आहे.
डहाणूच्या फळ बाजारात मार्च मिहन्याच्या पिहल्या आठवड्यापासून चैन्नईहून लालबाग जातीच्या आंब्याच्या एक-दोन पेट्यांची आयात विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. एका पेटीत २० किलो फळं असतात. शहरातील गौरीशंकर भगत या फळविक्रेत्यांनी त्या मागितल्या असून त्यांच्याकडून मोजक्या विक्रेत्यांकडेच तो उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तर १६० रुपये प्रतिकिलोने विक्री असताना, त्याला खवय्यांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पहिल्या टप्यातील हापूसचे दर जास्त असल्याने तो अद्याप विक्री करिता आणला नसल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान दहा वर्षापूर्वी बोर्डी परिसरात होळीच्या मुहूर्तावर स्थानिक आंबा पक्व होऊन त्याची निर्यात झाली होती. वाणगाव मंडळात २०८.७२ हेक्टर, कासा १६९.३२ हेक्टर आणि डहाणू मंडळात २३९.२८ हेक्टर या प्रमाणे ६४७.३२ हेक्टर एकूण क्षेत्र केशर, हापूस, रायवळ, राजापुरी, तोतापूरी, पायरी आदि जातींच्या कलमांची लागवड आहे. मेच्या मध्यावर स्थानिक आंबा पक्व होणार आहे. याकरिता आंबा नेटच्या माध्यमातून स्थानिक बागायतदारांकरिता आंबा निर्यातीकरिता आवश्यक माहिती देण्यात आली आहे. शिवाय युरोपीय देशात या फळं एजंसीच्या माध्यमातून पाठविण्याकरिता तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत २९ बागायतदारांनी नोंद झाली आहे.
स्थानिक आंबा एप्रिलअखेर पक्व होणार
तलासरी तालुक्यातील झाई-बोरीगावचे कृषीभूषण यज्ञेश वसंत सावे हे आघाडीचे आंबा बागायतदार आहेत. त्यांचा पाच एकरातील आंबा २० ते २५ एप्रिल दरम्यान पक्व होणार असून मुंबई, उपनगर आणि स्थानिक पातळीवर तो उपलब्ध होईल. साधारणत: या वर्षीचा आंब्याचा हंगाम तीन टप्प्यात असेल
त्यानुसार मध्य एप्रिल या पहिल्या टप्यात २५ टक्के आंबा, तर १० मे पर्यंत दुसऱ्या टप्यातील २५ टक्के आंबा असेल. त्यानंतर उर्वरित ५० टक्के आंबा उपलब्ध होईल. नेहमी प्रमाणे दुसऱ्या टप्यातील फळं विदेशात निर्यात केली जातील. त्यानुसार ते टप्पे पार पडणार आहेत.
मार्चच्या पिहल्या आठवड्यात लालबाग जातीच्या आंब्याची आयात चेंनाईहून करण्यात आली असून 160 रु पये दरातून विक्र ी सुरू आहे. त्याला स्थानिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
- गौरिशंकर भगत, आंबा विक्र ेता, डहाणू