चिकूची निर्यात तीन दिवस बंद

By admin | Published: July 5, 2016 02:37 AM2016-07-05T02:37:06+5:302016-07-05T02:37:06+5:30

रमजाननिमित्त दिल्ली येथील घाऊक बाजार बंद राहणार आहे. त्याचा प्रभाव चिकू खरेदी-विक्र ी व्यवहारावर होणार असून, येत्या ४, ५ आणि ६ जुलै रोजी डहाणूतील सरावली येथील चिकू खरेदी

Chikchi exports closed three days | चिकूची निर्यात तीन दिवस बंद

चिकूची निर्यात तीन दिवस बंद

Next

- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
रमजाननिमित्त दिल्ली येथील घाऊक बाजार बंद राहणार आहे. त्याचा प्रभाव चिकू खरेदी-विक्र ी व्यवहारावर होणार असून, येत्या ४, ५ आणि ६ जुलै रोजी डहाणूतील सरावली येथील चिकू खरेदी बंद करण्याचा निर्णय डहाणूतील संबंधित प्रशासनाने घेतला आहे. डहाणूतील चिकूकरिता दिल्ली ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. डहाणूतील चिकू दोन दिवसांनी दिल्ली येथे पोहचतो. मात्र रमजाननिमित्त बाजार बंद असल्याने बाजार भाव खालावण्याची शक्यता असते. तथापि डहाणूतील चिकू बागायतदारांचे व व्यवस्थापनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पावसाळ्यात चिकूला नवीन बहार सुरू झाला असून, या काळात दोन दिवस झाडावर चिकू राहिल्याने फळाचे नुकसान होत नसल्याचे मत प्रगतिशील चिकू बागायतदार देवेंद्र राऊत यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Chikchi exports closed three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.