चिकूचे भाव गडगडले; उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:50 PM2018-11-20T23:50:05+5:302018-11-20T23:50:24+5:30

उत्पादन नव्हते तेव्हा चढे दर, आता उत्पादन वाढले तर भाव गडगडल्याने चिकू उत्पादक पुरता हवालिदल बनला आहे. उत्पादन खर्चाची रक्कमही वसूल होणार नसून विम्याचा हप्ता मिळण्यास नेहमी उशीर का केला जातो अशी खंत, त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.

chikoo price down | चिकूचे भाव गडगडले; उत्पादक हवालदिल

चिकूचे भाव गडगडले; उत्पादक हवालदिल

Next

- अनिरु द्ध पाटील

बोर्डी : उत्पादन नव्हते तेव्हा चढे दर, आता उत्पादन वाढले तर भाव गडगडल्याने चिकू उत्पादक पुरता हवालिदल बनला आहे. उत्पादन खर्चाची रक्कमही वसूल होणार नसून विम्याचा हप्ता मिळण्यास नेहमी उशीर का केला जातो अशी खंत, त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.
या तालुक्यात ७४२७.३८ हेक्टर क्षेत्र चिकु लागवडीखालील आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने आणि वादळामुळे उत्पादन घटले. या वर्षी जुलै ते आॅगस्ट (पहिला आठवडा) या २७ दिवसांच्या काळात अतिवृष्टीने फायटोपथोरा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. या सर्वांमुळे झाडांवर फळं नव्हती. ऐन सणासुदीच्या हंगामात भाव गगनाला भिडले होते. जुलै ते आॅक्टोबर या दरम्यान प्रतवरीनुसार पहिल्या क्रमांकाचा चिकू १०० ते १२०, दुसरा ८० ते ९० आणि सर्वात कमी दर्जाचा (गोटी चिकू) ४० ते ५० रु पये प्रतिकिलोचा दर मिळत होता. यावर्षी कधी नव्हे असा १५० रुपयांचा ऐतिहासिक दर सुद्धा मिळाला आहे. मात्र दिवाळीनंतर उत्पादन वाढले तसा भाव गडगडायला प्रारंभ झाला. आता पहिल्या क्र मांकाला २०, दुसऱ्याला १० आणि गोटी फळांना ५ ते ६ प्रतिकिलो दर आहे. त्यामुळे अशीच स्थिती राहिल्यास उत्पादन खर्चही वसूल होणे जिकरीचे बनेल असे नरपडचे चिकू उत्पादक देवेंद्र राऊत यांनी सांगितले. तर मृग बहाराकरिता चिकू फळ पीक विमा लागू झाला आहे. तो आॅक्टोबर अखेरीस मिळणे क्र मप्राप्त होते. मात्र गतवर्षी प्रमाणे मे मिहन्यापर्यंत वाट पाहावी लागणार का? असा सवाल त्यांनी बँका आणि शासनाला केला आहे. विमा रक्कम मिळण्यास उशीर होणार असल्यास शेतकºयांना व्याजासकट मिळणे आवश्यक असल्याच्या मागणी जोर धरला आहे.
चिकू आणि नारळाला हमी भाव, प्रक्रि या उद्योगाला चालना, निर्यातक्षम बाजारपेठ आणि शीतगृहे आदी सुविधा तत्काळ मंजूर होण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न आवश्यकता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

उत्सव काळात झाडावर फळं नव्हती, तेव्हा चांगला भाव होता. आत्ता फळं आहेत मात्र दर खूपच कमी झालेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी होत असून त्याकरिता हमीभाव मिळालाच पाहिजे. विम्याची रक्कम मिळण्यात होणाºया दिरंगाईची चौकशी अपेक्षित आहे.
- देवेंद्र राऊत,
चिकू बागायतदार

Web Title: chikoo price down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.