खराब हवामानामुळे चिकूचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:09 AM2019-09-23T01:09:51+5:302019-09-23T01:09:59+5:30
शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी; बागायतदारांसह शेतकरी मेटाकुटीला
डहाणू : खरीप हंगामाने पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व पिकांची वाताहत केली असून त्यामध्ये चिकूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फळगळ झालेल्या चिकू बागांना यापुढचे तब्बल २० ते २४ महिने चिकूफळ लागण्याची शाश्वती नाही. ओस पडलेल्या या चिकू बागांमुळे चिकू कामावर अवलंबून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अतिवृष्टीमुळे भातशेतीला लागलेली कणसे गळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यातील घोलवड, बोर्डी कंक्राटी, वाणगाव डहाणू या भागात चिकूच्या बागा गेल्या १२५ ते १३० वर्षांपासून विकसित केल्या आहेत. १९८५ - ८६ पासून फलोद्यान योजनांमध्ये चिकू, आंबा, नारळ बागा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असून गरीब आदिवासी समाजाने देखील बागा विकसित केल्या आहेत. परंतु या खरीपातील अतिवृष्टीमुळे चिकू बागांचे आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने ताबडतोब सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी २ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याची बागायदारांची मागणी आहे. विशेषकरून येथील चिकू फळाला दिल्ली, काश्मीर भागात जास्त मागणी असून ही सर्व फळे रस्ते वाहतुकीने पाठविली जातात. चार वर्षांपासून रेल्वे भाड्यात खूप वाढ केली आहे. ही फळे वाहतूक रेल्वेमार्फत फळे स्वस्त दरात ग्राहकांना मिळतील आणि चिकू उत्पादकाला वाहतुकीपोटी कमी खर्च येईल, असे येथील चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.
चिकू संशोधन केंद्र उभारण्याचे काय झाले?
पालघर जिल्ह्यामध्ये बारा हजार हेक्टरमध्ये चिकू बागा विकसित झाल्या असून चिकू बागांवर उद्भवणाºया बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे द्राक्षाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र, डाळींबाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर येथे आहे. त्याच धर्तीवर डहाणू, घोलवड परिसरात चिकूचे राष्टÑीयसंशोधन केंद्राची मागणी २००७ पासून प्रलंबित आहे.
राष्ट्रीय चिकू संशोधन केंद्र, डहाणू - कोसबाड येथे उभारण्याची बागायतदारांची मागणी आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी या भागातील चिकूचे उत्पन्न प्रतिझाड प्रति वर्ष २५० ते ३०० किलो होते. ते आता जेमतेम १०० ते १२५ किलो प्रतिझाड आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रामार्फत या भागातील हवा आणि पाणी (पर्यावरणाचा) अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. स्थानिक रेल्वे स्टेशन डहाणू, पालघर, उंबरगांव, वापी, वलसाड स्टेशनवर चिकू विक्री केंद्रे तसेच स्थानिक उत्पादीत पदार्थ विक्री केंद्र शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकात उपलब्ध करून दिल्यास या भागातील शेतकºयांची आर्थिक क्र यशक्ती वाढण्यासाठी फार मोठी मदत होईल.
- विनायक बारी, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष