मुलांना पोषण आहारच नाही

By Admin | Published: August 6, 2015 11:27 PM2015-08-06T23:27:48+5:302015-08-06T23:27:48+5:30

शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा

Children do not eat nutrition | मुलांना पोषण आहारच नाही

मुलांना पोषण आहारच नाही

googlenewsNext

सुरेश काटे, तलासरी
शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या ठेकेदारातर्फे होणारा पोषण आहाराचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी दोन महिन्यांपासून आहारापासून वंचित आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. तलासरी तालुक्याच्या पटसंख्येनुसार फेडरेशनकडे पोषण आहाराची मागणी केली जाते. इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १०० ग्रॅम तर इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी १५० ग्रॅम असा पुरवठा होतो. यानुसार, तलासरी शिक्षण विभागाने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कन्झ्युमर फेडरेशनकडे तांदूळ १३००२२ किलो, मूगडाळ/मसूरडाळ ८६२५ किलो, तूरडाळ ८६२५ किलो, तेल ६५४६.५० किलो, मिरची १३४३ किलो, हरभरा-चवळी-मटकी ८६२५ किलो, मसाला १३४२.५० किलो, मीठ १३४३ किलो, जिरे ४३० किलो, मोहरी ४३० किलो, हळद ४३० किलो अशी मागणी जून, जुलै, आॅगस्टसाठी करण्यात आली. परंतु, १५ जूनला शाळा सुरू होऊन आज पावणे दोन महिने झाले, परंतु अजूनपर्यंत पोषण आहाराचा पुरवठा झाला नसताना अधिकारी अनभिज्ञ आहेत. गेल्या आर्थिक वर्षातही फेडरेशनकडून २८ हजार किलो तांदळाचा पुरवठा कमी करण्यात आला होता. तसेच तलासरी तालुक्याला या सामग्रीचा पुरवठा करणारा ठेकेदार त्याची काळ्याबाजारात विक्री करताना पकडण्यात आला होता. फेडरेशनकडून अनियमित पुरवठा करण्यात येत असल्याने आदिवासी विद्यार्थी वंचित राहत आहेत. परंतु, आर्थिक लागेबांधे असल्यामुळे फेडरेशनच्या पुरवठादारावर कारवाई करण्यात येत नाही. अच्छे दिनच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तरी यात लक्ष घालावे, अशी मागणी आदिवासी मुलांच्या पालकांनी केली आहे.

Web Title: Children do not eat nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.