विसर्जन मिरवणूकीत मिरच्याची धुरी, नालासोपा-यात तणावसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 06:35 PM2024-09-14T18:35:31+5:302024-09-14T18:36:10+5:30

नाळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

chili dhuri during ganpati immersion procession tension hike situation in nalasopara | विसर्जन मिरवणूकीत मिरच्याची धुरी, नालासोपा-यात तणावसदृश्य परिस्थिती

विसर्जन मिरवणूकीत मिरच्याची धुरी, नालासोपा-यात तणावसदृश्य परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान पेटत्या मिरच्यांची धुरी घराबाहेर गेटवर ठेवल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र नालासोपारा पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली आहे. ‌पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सबंधितांना नोटीस बजावली असून नागरीकांनी समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरवू नका असे आवाहन नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी केले आहे.

नाळा गावातील डिसील्वानगर येथील श्री साई यूवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशाच्या शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी बोडणनाका येथे राहणारे निवृत्त शिक्षक मायकल लोपीस यांनी घराबाहेर अंगणात मिरच्या पेटवून धुरी केला होता. मिरवणूक त्यांच्या राहत्या घरासमोर आली असताना मायकल यांनी त्या पेटत्या मिरच्या गेटजवळ नेऊन ठेवल्यामुळे त्राचा त्रास मिरवणुकीत सामील झालेल्यांना झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा जाब मायकल यांना विचारल्यावर त्यांनी घरातून लाकडी दांडका आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर शनिवारी सकाळी मायकल यांनी घराबाहेर गेटवर फळ्यावर काही आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवला होता. आदल्या रात्री घडलेल्या घटनेनंतर लोपीस कुटुंबानी हा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे परीसरातील नागरीक एकत्र आले होते. नाळे भंडार आळी, लाखोडी, पढ‌ई, वाळूंजे, डिसिल्वा नगर आदी परिसरातील शेकडो नागरीकांनी लोपीस यांच्या घराबाहेर एकत्र येऊन घोषणाबाजी करत शुक्रवारच्या घटनेबद्दल व फळ्यावरील मजकुराबाबत जाब विचारला. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात सदर घटनेची कागदोपत्री नोंद केली असून समोरच्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करत नोटीस बजावली आहे. नाळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: chili dhuri during ganpati immersion procession tension hike situation in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.