चिमुरडी कोमल कचरा वेचून भरते पोट!
By admin | Published: November 14, 2016 03:48 AM2016-11-14T03:48:51+5:302016-11-14T03:48:51+5:30
वडील कुटुंबाचा त्याग करून गेलेले. इतरांच्या घरी धुणे-भांंड्याची कामे करणाऱ्या आईची कमाई पुरत नाही. त्यामुळे चिमुरड्या कोमलवर कचरा वेचून
अरिफ पटेल / मनोर
वडील कुटुंबाचा त्याग करून गेलेले. इतरांच्या घरी धुणे-भांंड्याची कामे करणाऱ्या आईची कमाई पुरत नाही. त्यामुळे चिमुरड्या कोमलवर कचरा वेचून घरखर्चाला हातभार लावण्याची पाळी ओढावल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळते. सोमवारी बालदिन आहे. पण तो फक्त आहे रे वर्गातील बालकांसाठीच!
कोमलसारख्या लाखो मुला-मुलींना आपल्यासाठी असा काही दिवस असतो आणि तो साजरा केला जातो याची कल्पनाही नसेल. सगळेजण रस्त्याने जाताना-येताना तिची धडपड पाहतात. पण कुणाच्याही काळजाला पाझर फुटत नाही. शाळेत जाण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुरडीवर कचरा वेचून कुटुंबाला हातभार लावण्याची आलेली वेळ टळावी, तिला तिचे बालपण मिळावे यासाठी आपण काही करावे असे कुणालाही वाटत नाही. गांधी नगर मध्ये रहाणारी कोमल तिचे भाऊ करण व किरण यांचा सांभाळही करते आणि कचराही गोळा करते. ती सांगते की, मेरे भाई और मै सुबह से कचरा पुठ्ठा, प्लास्टिक, बोटल, जो मिला उसे जमा करके ऊसे भंगार के दुकान मे बेचते है और २५ या ३० रुपये मिलते है उससे रोज का खाना खाते है। आम्ही गांधी नगर पालघर येथे रहातो माझे वडील आम्हाला सोडून गेले माझी आई व आम्ही तिघे रहातो आई भांडी कपडे धुण्याचे काम करते आम्ही कचरा वेचून मिळेल त्या पैशाने उदरनिर्वाह करतो. कचरा वेचतांना बिल्डिंग मध्ये रहाणारे शिव्या देतात पाठलाग करतात चोर म्हणतात कधी मारझोडही करतात.