चिनी वस्तूंचे दिवाळीवरही वर्चस्व; फॅन्सी दिवे आणि फ्री हॅण्ड रांगोळीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:19 AM2017-10-15T02:19:41+5:302017-10-15T02:19:52+5:30
दिवाळीचा सण गोडधोडाचा असला तरी कपड्यापासून फटाके, रोषणाई आणि शोभेच्या वस्तुंच्या खरेदी केडे ग्राहकांचा मोठ असतो. हेच हेरून चिनी व्यावसाईकांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात उतरवला
- राहुल वाडेकर।
विक्रमगड : दिवाळीचा सण गोडधोडाचा असला तरी कपड्यापासून फटाके, रोषणाई आणि शोभेच्या वस्तुंच्या खरेदी केडे ग्राहकांचा मोठ असतो. हेच हेरून चिनी व्यावसाईकांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात उतरवला असून ग्रामिण भागातील ग्राहकांचा कल हा स्वस्त माल खरेदीकडे दिसून येत आहे. एकंदरच किरकोळ व्यापारात मेड इन चायनाचा बोलबाला असून मेक इन इंडियाची मोहीम फक्त सोशल मिडियावरच दिसून येत आहे.
महागाई वाढली असली तरी खरेदीदांरामध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही़ दिवाळीसाठी गोड-धोड, फराळ, मिठाई, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळया, दिव्यांनाही दरवर्षीप्रमाणे मोठी मागणी आहे. पूर्वी दिवाळीत पारंपारीक आकाशकंदील दिसायचे, मात्र गेल्या काही वर्षापासून वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांची चलती पहायला मिळाली. या वर्षी तर खास चिनी वस्तंूबरोबर चिनी आकाशकंदीलांनीही बाजारपेठा सजल्या आहेत. कमी किंमत आणि आकर्षक असे हे आकशकंदिल ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.
१५० ते १००० रुपयांपर्यत त्यांचे दर आहेत़ परंपरा जपणारे प्लॉस्टीक आणि कागदी आकाशकंदीलांना जास्त पसंती आहे़ देवदेवता, विश्वचषक, कार्टून, कमळ, गोल सिलेंडर, अंडाकृती, चायना बलून, फुलपाखरे अशा विविध आकारांत ती उपलब्ध आहेत़ वारली पेटिंगची कलाकुसर केलेले आकाशकंदीलही बाजारात दिसत आहेत़ दरम्यान, दिवाळीसाठी असलेल्या वस्तूंचे भाव २० टक्कांनी वाढलेल आहेत़ मात्र, त्याचा बाजारातील खरेदीवर विशेष परिणाम दिसून येत नाही.
फॅन्सी दिवे आणि फ्री हॅण्ड रांगोळीकडे कल
चिनी आकाशकंदीलासोबत तोरणांनीही बाजार सजले आहे़त. आकर्षक कलाकृती आणि सामान्यांना परवडतील अशा दरातील तोरणे उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल त्याकडे आहे़ पाचशेच्या आत त्याचा किंमत आहे़त. पणत्यामध्ये साधे दिवे, फॅन्सी दिवे, स्टॅड असलेले सजावट केलेल्या पणत्या, पणत्यांची माळ असे विविध आकारातील पणत्या ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत़
विविध रंगाचे आणि रांगोळीमिश्रीत रंगाची पाकिटे १० ते २० रुपये पासून उपलब्ध आहेत़ पारंपारीक रांगोळी सोबतच आता संस्कारभरतीची, धान्यांची, फुलांची, पाण्यावरची व फ्री हॅड रांगोळीही काढली जाते़ चाळणीच्या जाळीवर विविध डिझाईन असलेल्या रांगोळीचे छापदेखील बाजारात उपलब्ध आहेत.