आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

By admin | Published: May 3, 2016 12:38 AM2016-05-03T00:38:55+5:302016-05-03T00:38:55+5:30

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल

Circled but scenic historic backpack area | आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

Next

- वसंत भोईर,  वाडा

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता. कौलारु घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य आपल्याला गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते. हे दोन भागात विभागले आहे, गाव आणि कोठी.
हे गाव इतर गावांसारखेच. पण या गावाने आपल्या पोटात सामावून घेतला आहे पेशव्यांचा इतिहास. या गावाने अनुभवला आहे चिमाजी आप्पांचा सहवास. गावाने ऐकले आहेत चिमाजी आप्पांनी सैन्याला व सरदारांना दिलेले आदेश आणि मुख्य म्हणजे चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो सुद्धा याच गावात.
काळाच्या ओघात गावकरी गुंज गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि चिमाजी आप्पांना विसरले असतील, पण गावात असलेले पेशवेकालीन परशुराम उर्फ भार्गवरामाचे मंदिर, डोंगराच्या पायथ्याशी असलेले तळे व त्याच्या काठावरती असलेले मंदिराचे भग्न अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने चिमाजी आप्पांचा इतिहास अजूनही जिवंत आहे. गावातील या पार्श्वभूमीचा गावकऱ्यांनी पर्यटन व त्यातून अर्थार्जनासाठी वापर केल्यास येथील आर्थिक परिस्थिीती सुधारुन गावकऱ्यांना उपजिवीका मिळेल. (वार्ताहर)

भार्गव अर्थात परशुराम मंदिर
गुंज गावात असलेले भार्गवरामाचे मंदिर एक टेकडीवर असल्यामूळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते. गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला भार्गवरामाच्या मंदिरात आपल्याला घेऊन जाते. हा तलाव आॅक्टोबर-जानेवारीमध्ये कमळासारख्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. पण ही कमळाची फुले नसून ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले आहेत.
फुलांचे हे सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि आणि कोरीवकाम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने आपले पाऊले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून हे मंदिर १३ व्या शतकातील वाटते.

भार्गवराम मंदिर एका टेकडीवर असून मंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. भार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभा दगडात बांधले आहे.
मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करते. मंदिराजवळून दिसणारे १५ ते २० घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य फार सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यमुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानफुले दृष्टीस पडतात.

Web Title: Circled but scenic historic backpack area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.