नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 12:00 AM2020-12-07T00:00:03+5:302020-12-07T00:02:08+5:30

Nalasapara News : लॉकडाऊनच्या काळात अनेक नायजेरियन नागरिक बाहेरून नालासोपारा शहरात राहण्यास आले आहेत. त्यांच्याविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

The city of Nalasapara is becoming a haunt of Nigerians | नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

googlenewsNext

- मंगेश कराळे

नालासोपारा : शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला नायजेरियन नागरिकांचे अड्डे बनले आहेत. तुळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांतर्गत अंदाजे दाेन ते तीन हजार नायजेरियन नागरिक बेकायदा राहत असल्याची चर्चा असून पाेलीस ठाण्यांत हाताच्या बाेटांवर माेजण्याइतक्याच नागरिकांची नाेंद आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक नायजेरियन नागरिक बाहेरून नालासोपारा शहरात राहण्यास आले आहेत. त्यांच्याविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, पाेलिसांनी बेकायदा खाेली भाड्याने देणाऱ्या घरमालकांना नाेटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नायजेरियनच्या गँग नालासोपारा शहरात सक्रिय असून अमली पदार्थ विक्री, फसवणूक, लॉटरी स्कीम, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. नालासोपारा शहरात पूर्वेत आचोळे गाव, अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवालनगर, प्रगतीनगर, रेहमतनगर तर पश्चिमेकडील हनुमाननगर या परिसरात नायजेरियन बेकायदा राहत आहेत. मात्र, तुळिंज पोलीस ठाण्यात १९ तर नालासोपारा पोलीस ठाण्यात दाेन नायजेरियन नागरिकांची नोंद आहे. काही नायजेरियन नागरिकांनी भारतीय महिलांशी विवाह करून येथे राहण्याची साेय केली आहे, तर मुंबईहून अमली पदार्थांच्या गुन्ह्यातून सुटून आल्यानंतर काहींनी बस्तान नालासोपारा शहरात मांडले आहे. जास्तीचे मिळणारे घरभाडे आणि वर्षभराची एकत्र रक्कम मिळत असल्याने त्यांना घरे भाड्याने दिली जात आहेत. त्यामुळे घरमालक आणि एजंटांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये भाडेकरूंसंदर्भात विशेष माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना कळविणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे लवकर काही भागांत विशेष शोधमोहीम घेऊन कारवाई सुरू केली जाणार आहे.     - प्रशांत वाघुंदे,              पोलीस उपायुक्त, झोन ३ 

ज्या नायजेरियन नागरिकांच्या नोंदी पोलीस ठाण्यात नाहीत, अशा घरमालक आणि दलालांवर कारवाई करणार. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांना आणि घरमालकांना नोटिसा देण्यास शनिवारपासून सुरुवात केली आहे.
- जयकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे

पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नायजेरियन नागरिक राहत असल्याची नोंद असून जे अनधिकृतपणे राहत आहेत किंवा त्यांना राहण्यासाठी सदनिका देत आहेत त्या घरमालकांना लवकरच नोटिसा देऊन कारवाई करणार आहे.
- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे  

Web Title: The city of Nalasapara is becoming a haunt of Nigerians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.