पालघरमध्ये मनसेकडून सविनय कायदेभंग, कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:04 PM2020-09-21T12:04:23+5:302020-09-21T12:21:25+5:30

सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा, यासाठी राज्य सरकारकडे विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती.

Civil law violation by MNS in Palghar, train journey by activists | पालघरमध्ये मनसेकडून सविनय कायदेभंग, कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रवास

पालघरमध्ये मनसेकडून सविनय कायदेभंग, कार्यकर्त्यांकडून रेल्वे प्रवास

Next

पालघर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करण्यात आली नाही. लोकल सेवा बंद असल्याने दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे.
सोमवारी मनसेचेपालघर उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालघर रेल्वे स्थानकातून केळवे रोड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले.

कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पालघर, डहाणू  येथून हजारो नागरिक दररोज लोकलने प्रवास करत मुंबईला जातात मात्र करण्याच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल सेवा बंद असल्याने या चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे.  

सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा, यासाठी राज्य सरकारकडे विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. चाकरमान्यांचे भरपूर हाल होत आहेत. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग करत आहोत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलकांनी यावेळी सांगितले.

आणखी बातम्या...

- 'पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो', मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

- India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक    

- आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस    

Web Title: Civil law violation by MNS in Palghar, train journey by activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.