वनविभागाचे स्वच्छ भारतकडे दुर्लक्ष

By admin | Published: November 16, 2016 04:09 AM2016-11-16T04:09:07+5:302016-11-16T04:09:07+5:30

डहाणू येथे ५ ते १० नोव्हेंबर या काळात वनरक्षक भरती पार पडली. त्या दरम्यान पार पडलेल्या धावण्याच्या चाचणीत सहभागी झालेले उमेदवार

Clean India of forests ignored India | वनविभागाचे स्वच्छ भारतकडे दुर्लक्ष

वनविभागाचे स्वच्छ भारतकडे दुर्लक्ष

Next

बोर्डी : डहाणू येथे ५ ते १० नोव्हेंबर या काळात वनरक्षक भरती पार पडली. त्या दरम्यान पार पडलेल्या धावण्याच्या चाचणीत सहभागी झालेले उमेदवार, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी अधिकारी यांनी प्लास्टिकचा कचरा फेकल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिकांनी केली आहे.
पालघर जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरतीच्या रिक्त पदांसाठी महिला तसेच पुरु ष उमेदवारांची ३ व ५ किमी धावण्याची चाचचणी ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या करिता डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड पोलीस चौकी ते चिखले वडकती मैदानादरम्यानच्या मार्गाची निवड करण्यात आली होती. प्रतिदिन आठ टप्यात पार पडलेल्या या स्पर्धेकरिता सकाळी साडेसात ते साडेपाच या प्रत्येक टप्प्यावेळी वीस मिनिटांकरिता रस्त्यावरील वाहतूक बंद केली जात होती. विशेषत: पीक अवर मध्ये रस्ता घडविला जात असल्याने शिवसेनेच्या चिखले शाखेने विरोध दर्शविल्याने तसेच स्थानिकांनी साथ दिल्याने हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते.
दरम्यान ही भरती प्रक्रि या पार पडून आठवडाभराचा अवधी उलटला आहे. तिला उपस्थित सुमारे पाचहजाराहून अधिक उमेदवार, त्यांचे नातेवाईक आणि वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पाणी पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिक ग्लास व बाटल्या जागोजागी उघड्यावर फेकल्या आहेत.
३ किमी अंतराच्या स्पर्धेच्या एंडिंग पॉर्इंट जवळ चिखले रीठिनजिक प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हा परिसर समुद्रकिनाऱ्यालगतचा व सुरु बागांनी वेढला असून जैवविवितेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चिखले हे पर्यटनस्थळ असल्याने या प्रकाराने पर्यावरणासह गावच्या सौंदर्याला बाधक ठरत आहे.
(वार्ताहर)

Web Title: Clean India of forests ignored India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.