क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:41 PM2019-10-08T23:41:26+5:302019-10-08T23:41:34+5:30

वसई तालुक्यात स्वच्छतेसाठी मुख्य परिसरात, महामार्गावर, स्थानकाबाहेरील परिसरात क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते.

 Cleanup Beat Marsh imposes a penalty of Rs | क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल

क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल

Next

विरार : शहरात सर्वत्र स्वच्छता असावी तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी वसई - विरार महानगरपालिकेतर्फे गेल्या वर्षी स्वच्छतेसाठी क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते. वर्षभरात या पथकाने संपूर्ण वसई तालुक्यात कारवाई केली आहे. मात्र, कारवाई सुरू असतानाही शहरात काही ठिकाणी अस्वच्छता तशीच आहे.
दरम्यान, काही महिन्यांपासून स्थानकाबाहेर अथवा शहरात क्लीन - अप बीट मार्शल दिसत नसल्याने नागरिकांकडून बिनधास्तपणे अस्वच्छता पसरवली जात आहे. वसई तालुक्यात स्वच्छतेसाठी मुख्य परिसरात, महामार्गावर, स्थानकाबाहेरील परिसरात क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते. पहिल्या वर्षी या मार्शल्सनी चांगले काम केले असले तरी काही ठिकाणी अजूनही अस्वच्छता आहे.
गंमत म्हणजे, सर्वत्र बीट मार्शलची उपस्थिती असतानाही स्थानकाबाहेर आणि मुख्य रस्त्यांवर अस्वच्छतेचे प्रमाण वाढते आहे. बीट मार्शल केवळ दुपारच्या वेळात स्थानकाबाहेरील परिसरात उपलब्ध असतात. तर काही ठिकाणी क्लीन - अप बीट मार्शलची सुविधा नसल्याने त्या परिसरांमध्ये मोेठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. हे बीट मार्शल नेमक्या वेळेतच हजर असल्याने इतर वेळी नागरिक कचरा तसेच घाण पसरवत असतात.
सुटीच्या वेळेस वसई - विरारमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे यावेळी बीट मार्शल्सची सर्वाधिक गरज असते. मात्र, ते कुठेच दिसत नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. क्लीन - अप बीट मार्शल कडून चांगलीच कारवाई झाली असली तरी शहरात सध्या क्लीन - अप बीट मार्शलचा वावर कमी झाला असल्याचे दिसत आहे. हे टाळण्यासाठी शहरात क्लीन अप मार्शल असावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

पहिल्याच वर्षात बीट मार्शल पथकाने चांगलीच कारवाई केलेली आहे. अस्वच्छता पसरत असली तरी त्यावर कारवाई देखील सतत सुरु आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.
- स्वच्छता विभाग अधिकारी,
वसंत मुकणे

Web Title:  Cleanup Beat Marsh imposes a penalty of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.