क्लायमेटकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By Admin | Published: March 21, 2017 01:32 AM2017-03-21T01:32:15+5:302017-03-21T01:32:15+5:30
क्लायमेट स्मार्ट व्हिलेज अंतर्गत १६ ते १८ जानेवारी व २० ते २३ फेबु्रवारी या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्र शिबीर
जव्हार : क्लायमेट स्मार्ट व्हिलेज अंतर्गत १६ ते १८ जानेवारी व २० ते २३ फेबु्रवारी या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्र शिबीर कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजिण्यात आले होते. ७० पेक्षा जास्त गावातील जवळपास ३५० शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.
बदलत्या वातावरणामुळे शेती व मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम व समस्या यांवर मात करण्यासाठी बोरलॉग इन्स्टीट्यूट फॉर साऊथ एशिया, प्रगती प्रतिष्ठान जव्हार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात कृषी व त्यावर आधारीत उद्योग याविषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये पीक नियोजन, संरक्षण तसेच आळिंबी लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन, गांडुळखत निर्मिती, फुल व भाजीपाला लागवड, मृद संधारण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. या दरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत सखोला माहीती घेतली. तसेच या शिबिराचा प्रमुख उद्देश म्हणजे हवामानाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याचे सुसुत्रीकरण हा होता. या बाबत शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांना मिळालेले मार्गदर्शन हे एक प्रभावी व मोलाचे असून आम्ही या ज्ञानाचा निश्चितच वापर करू असे ते म्हणाले. या शिबिराबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत. (वार्ताहर)