महाराष्ट्र बॅँकेच्या बाहेर ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:27 AM2018-04-25T02:27:59+5:302018-04-25T02:27:59+5:30
जागेचा अभाव : जव्हार शाखा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, भर उन्हात आदिवासींच्या रांगा
जव्हार: शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्टÑ बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हा तान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. महाराष्टÑ बॅँक जव्हार शाखेकडून होणाऱ्या खातदारांचे हाल होत असून अजूनही तिच परिस्थिती येथे पहावयास मिळत आहे.
मागील वर्षी लोकमतने ही बाब उघड केल्यानंतर तातडीने बँकेने बाहेर सावलीकरीता मंडप टाकले होत. मात्र काही दिवसांनी ते काढून टाकले. त्यामुळे परिस्थिती जैसे थे झालेली आहे. २०१६ मध्ये शासनाचे डि.बी.टी. (डायरेक्ट बॅँक ट्रान्सफर) पध्दत सुरू करून शासकीय योजनेचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच, शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया वस्तूंचेही डि. बी. टी. करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे राष्टÑीयकृत बॅँकात खाते उघडणे कामी व व्यवहारासाठी गर्दी होऊ लागली. जव्हारमध्ये महाराष्टÑ बॅँकेची गांधी चौक येथे एकमेव शाखा असून खुपच तोकड्या जागेत आह.
या बॅँकेत हजारो ग्राहकांचे बचत व चालू खाते आहेत, मात्र अपुºया जागेमुळे या बॅँकेच्या बाहेर नोहमीच गर्दी होऊन वाहातूक वर्दळ होत असते. तसेच, बॅँकेच्या बाहेर छोटीशी शेड आहे परंतू ग्राहकांची गर्दी ही जवळ जवळ १५ ते १८ मिटर लांब लांब रांगा सकाळी ९.०० वाजे पासुन दुपारी ४.०० वा. होत असते.
बॅँक प्रशासनाचे डोळे कधी उघडणार
एप्रिल व मे महिंन्यात उन्हाचा तडाखा इतका जोरदार असतो की अपेकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. सध्या तापमान ४१ अंशावर आहे.
उन्हाचे चटके असह्य झालेले आहेत. यामध्ये महिला ग्राहक मोठ्या संख्येने बॅँकेच्या बाहेर उभे रांगेत उभ्या राहुन पैसे काढतात. त्यामुळे बॅँकेने सोय करणे गरजेचे आहे.
बसण्यासाठी नाही तर निदान उन्हा पासुन बचाव करण्यासाठी बॅँकेच्या बाहेर मंडप टाकावे अशी मागणी येथील ग्राहकांनी केली आहे.
मात्र अपुºया जागेची समस्या जैसे थे ! त्यामुळे बॅँकेने तातडीने नविन शाखे करीता निवड करण्यात आलेल्या प्रशस्त जागेत शाखा सुरू करण्याची मागणी होत आहे.