वाढवण बंदर सर्वेक्षण काम पाडले बंद
By Admin | Published: October 22, 2016 01:35 AM2016-10-22T01:35:35+5:302016-10-22T01:35:35+5:30
न्यायालयाच्या आदेशाने १८ वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेला वाढवण बंदर प्रकल्प पुन्हा रेटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचा यासंदर्भातील
डहाणू : न्यायालयाच्या आदेशाने १८ वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेला वाढवण बंदर प्रकल्प पुन्हा रेटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचा यासंदर्भातील आदेश धाब्यावर बसवून शुक्रवारी पोलीस संरक्षणात बंदराच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. त्याला आक्षेप घेत वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने जोरदार निदर्शने करून काम बंद पाडले.
वाढवण बंदराच्या प्रोटोग्राफिकल सर्व्हेचे काम जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने नेमलेल्या दोन कंपन्यांनी पोलीस संरक्षणात तिडयाळे येथे सुरू केल्याचे कळताच परिसरातले मोठ्या संख्येने एकत्र आले होते. (वार्ताहर)