सीएम तुमचा सवरांवर भरोसा नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:34 AM2018-05-23T02:34:36+5:302018-05-23T02:34:36+5:30
वनगा यांच्या मृत्यूनंतरच्या राजकीय हालचाली झाल्या त्यालाही सवराच जबाबदार असल्याचा मतप्रवाह बनला आहे
जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून भाजपामध्ये जोरदार ईनकमिंग सुरू आहेच तर बाकी सर्वच पक्ष आपआपल्या परीने प्रचार करीत आहेतच मात्र या सगळ्या एक गोष्ट प्रामुख्याने चर्चिली जात आहे ती म्हणजे आदिवासी विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा या सगळ्या प्रक्र ीयेत बॅकफूटवर असून पालघरात मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील लोकांच्या हातात संपूर्ण प्रचार यंत्रणा गेली आहे. भाजपाला पाठींबा दिलेल्या श्रमजीवी संस्थापक विवेक पंडीत आणि निलेश सांबरे यांचे भाजपात सध्या सवरा पेक्षाही जास्त चालत असल्याचे बोलले जात असून विशेष म्हणजे आजवरचे सर्व मोठे प्रवेश थेट मुख्यमंत्र्याच्या सोर्सनेच झाल्याने मुख्यमंत्री तुमचा सवरांवर भरोसा नाय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
खुद्द मुख्यमंत्र्यांनी पालघरात अधिकच लक्ष घातले आहे विशेष म्हणजे हे करताना फडणविस यांनी पालघरात स्थानिक भाजप लोकप्रतिनिधीवर विशेष करून सवरा यांच्यावर अविश्वास दाखविला आहे कारण याठीकाणी प्रत्येकगट गणात विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सक्रीय आहेत याशिवाय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार किसन कथोरे संजय केळकर भिवंडीचे खासदार कपिल पाटील आमदार मनिषा चौधरी पासून विवेक पंडित कोकण मंचचे निलेश सांबरे अशी सर्व टीम कामाला लावली असून यांचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी आहे.
वनगा यांच्या मृत्यूनंतरच्या राजकीय हालचाली झाल्या त्यालाही सवराच जबाबदार असल्याचा मतप्रवाह बनला आहे अशा परीस्थितीत त्यानां समोर आणने जिकरीचे बनु शकते हे समजून उमजूनच मुख्यमंत्र्यानी आपली टीम याठिकाणी कामाला लावली असून ही पोटनिवडणुक जिंकण्यासाठी सवरांना थोड बाजूला सारावे लागले हे खरे.