वाढवण बंदर आक्रोशाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; आज मच्छिमार संघटनांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:34 AM2020-12-18T00:34:19+5:302020-12-18T06:44:03+5:30

वाढवण बंदराविरोधात मच्छिमार आक्रमक; मुंबईसह अन्य भागांतून आंदोलनाला पाठिंबा

CM uddhav thackeray took notice of the Wadhwan port outcry | वाढवण बंदर आक्रोशाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; आज मच्छिमार संघटनांची भेट घेणार

वाढवण बंदर आक्रोशाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; आज मच्छिमार संघटनांची भेट घेणार

Next

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधातील आंदोलनाची आग थेट मुंबईपर्यंत पसरल्यानंतर लोकांच्या आक्रोशाची दखल घेत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह मच्छीमार संघटनांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे भेटण्याची वेळ दिली आहे. यामुळे वाढवणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागच्या २३ वर्षांपासून वाढवण बंदराच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आक्रोशाची तमा न बाळगता केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा वाढवण बंदर उभारण्याच्या हालचाली सुरू केल्याने किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता मुंबईसह अन्य भागांतून पाठिंबा वाढत चालला आहे.

 लोकांना वाढवण बंदर नको असेल तर शिवसेना स्थानिकांच्या सोबत असेल, असे जाहीर आश्वासन शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक वेळा दिले होते. अशा वेळी राज्य शासनाच्या पोलिसांच्या बंदोबस्तात प्राधिकरण अथवा योग्य त्या विभागांची कुठलीही परवानगी ना? घेता जबरदस्तीचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याविरोधात स्थानिकांनी उभारलेल्या लढ्यात कुठेही शिवसेना दिसून येत नसल्याने शिवसेनेची दुटप्पी भूमिका तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. 

मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह अन्य संघटनांंना आमंत्रित केल्या माहिती संघर्ष समितीचे सरचिटणीस वैभव वझे यांनी दिली.

Web Title: CM uddhav thackeray took notice of the Wadhwan port outcry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.